ताज्याघडामोडी

स्टेट बँकेने ‘या’ नियमात केला मोठा बदल, पालन न केल्यास खाते गोठवणार

ऑनलाइन बँकिंग अ‍ॅप YONO च्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक कठोर नियम लागू केला आहे. ग्राहकांना या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. मोबाइल बँकिंगचा वापर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे व यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे एसबीआयने हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांचे खाते गोठवले जाणार आहे.

SBI YONO App च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या खातेधारकांना अ‍ॅपमध्ये एक गोष्ट सुनिश्चित करावी लागणार आहे. बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरचा उपयोग केल्यावरच ग्राहकांना या अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येईल. इतर नंबरचा वापर केल्यास व्यवहार करण्याची परवानगी मिळणार नाही.

बँकेने योनो अ‍ॅपशी संबंधित माहिती ट्विट करत दिली आहे. एसबीआयने माहिती दिली की, बँक योनो अ‍ॅपच्या सिक्युरिटी फीचर्सला वाढवत आहे. अ‍ॅपचे नवीन अपग्रेड केवळ रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे लॉगइन करणाऱ्या ग्राहकांनाच ऑनलाइन बँकिंगची सुविधा देईल.

बँकेने हे पाऊल SBI YONO अ‍ॅपद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी उचलले आहे. अनेकदा ग्राहकांचे यूजर नेम, पासवर्ड व अन्य माहिती घेऊन अ‍ॅपमध्ये लॉगइन करून फसवणूक केली जाते. एसबीआयला अपेक्षा आहे की नवीन नियमांमध्ये फसवणुकीच्या घटना कमी होतील. त्यामुळे जर एसबीआयचे ग्राहक असाल तर योनो अ‍ॅप वापरताना रजिस्टर्ड मोबाइल नंबरचाच वापर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *