गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी

पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात मॉर्निग वॉक वरून परतणाऱ्या डॉक्टर पत्नीचे सव्वालाखाचे मंगळसूत्र लंपास

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, धक्कादायक प्रकार

महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने सदर अधिकारी या महिलेशी सलगी करत होता. मारहाणीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाजी आव्हाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली, मात्र पोलिसांनी […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवले आहे. आता 23 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकरणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवार,देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात अश्लील भाषेच्या पोस्ट

राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्‍या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला. काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चंदनतस्करीत चक्क सरपंचच निघाला आरोपी

चंदनतस्करी करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या चंदनतस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून, तो एका पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सहा किलो चंदन व दुचाकी असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अमर नामदेव पवार (वय 30, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38, […]

ताज्याघडामोडी

केंद्र अन् राज्याच्या भांडणात आमचा बळी; शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली खंत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे.मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले

वडिलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टोरेंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तक्रारदार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिका-यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी 50 हजाराची मागणी केली होती. 40 हजार रूपये लाच स्विकारताना मलकापूर अर्बन बँकेसमोर रंगेहात पकडले. आरोपी संजय उत्तमराव केवट (46) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि खासगी […]

ताज्याघडामोडी

शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना मिळणार लस

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसींची डोस […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे

ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी […]