ताज्याघडामोडी

केंद्र अन् राज्याच्या भांडणात आमचा बळी; शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली खंत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे.मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असे सरनाईक म्हणाले. आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे उघडावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. अनेकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. परंतु, अशा संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आयतच निमंत्रण मिळेल.

त्यामुळे देव्हाऱ्यात देवाची पूजा करावी. मंदिरे उघडण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी, असे सांगतानाच आज ना उद्या शाळाही उघडतील. याबाबत सरकार आणि लवकर तोडगा काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *