वडिलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टोरेंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तक्रारदार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिका-यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी 50 हजाराची मागणी केली होती.
40 हजार रूपये लाच स्विकारताना मलकापूर अर्बन बँकेसमोर रंगेहात पकडले.
आरोपी संजय उत्तमराव केवट (46) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि खासगी इसम प्रशांत बाबुराव सांगोले रा. देवीनगर वडाळी यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टोरेंट यामध्ये दुय्यम निरीक्षक संजय केवट यांनी तुमच्या स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे सांगून कारवाई करणार असल्याचे सांगितले. तक्रारदार यांच्याकडे कारवाईपासून वाचण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
तडजोडीअंती 40 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी 9 सप्टेंबरला सापळा रचून संजय केवट व खासगी इसम प्रशांत सांगोले यांना पैसे घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, सतीश उंबरे, सुनील व-हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे, अभय वाघ, तुषार देशमुख, निलेश महिंगे, सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी केली आहे.