ताज्याघडामोडी

नो एन्ट्री डास पॅकेट आता सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध

अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले नो एन्ट्री डास पॅकेज सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. 30 रुपयांचे हे पॅकेट घरात कुठेही लावता येते. या पॅकेटमधील वनस्पतींच्या वासाने सर्व डास पळून जातात. मेघालय राज्यातील वनस्पतींपासून हे पॅकेट तयार केले आहे. या पॅकेतचा अमरावती, नागपूर, अकोला व नांदेडवासीयांमध्ये चांगला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बापरे.दुधात चक्क सोयबीन तेल, घातक पॅराफीनची भेसळ; 40 ड्रमसह नाशिकमध्ये एकाला बेड्या

जिल्ह्यातल्या सिन्रर तालुक्यातल्या पाथरे खुर्द गावामध्ये दुधात चक्क सोयाबीन तेल आणि पॅराफीनसारख्या घातक पावडरची भेसळ करून विक्री करणाऱ्यास अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.अक्षय गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातल्या पाथरे गावात स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रावर दुधाची भेसळ सुरू होती. याची माहिती समजताच अन्न भेसळ प्रतिबंधक […]

ताज्याघडामोडी

बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

  बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी ( दि. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.सुभाष तेलोरे ( रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे.

ताज्याघडामोडी

शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवार आमचे नेते होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, असा घणाघातही त्यांनी केला आहे.केवळ तडजोड महाविकास आघाडीत असल्याचेही अनंत गीते म्हणाले आहेत. अनंत गीते पुढे म्हणाले की, दुसरा कोणताही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला […]

ताज्याघडामोडी

पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार, तुमच्या खिश्यावर पडणार भार?

सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यातच १ ऑक्टोबरपासून तुमच्या पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियमांत मोठे बदल होणार आहेत. या नव्या नियमांमुळे तुमच्या पगारावर परिणाम होत बँकेत जमा होणारा पगार कमी होऊ शकतो. याशिवाय बँकेतील पैशांसंदर्भातील नियमात बदल होणार आहे. नेमके बँकेशी संबंधित नियमांत काय बदल होणार? यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडणार […]

ताज्याघडामोडी

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची […]

ताज्याघडामोडी

भाजपच्या माजी मंत्र्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये  रजिंदरपाल सिंह भाटिया […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांविरोधात अश्लील भाषेत पोस्ट करणाऱ्या अभिजीत लिमयेच्या मुसक्या आवळल्या

‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या लखोबा लोखंडे या फेसबुक पेजचा ऍडमिन असलेल्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी सांगली […]

ताज्याघडामोडी

सावधान! SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना अलर्ट; Fake क्रमांकावर कॉल करू नका अन्यथा नुकसान अटळ

डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर भामट्यांपासून सतर्क केले आहे. नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहबकांना एक फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे. एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसासाठी वातावरण अनुकूल बनले असून हवामान खात्याने 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावस होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी विशेषता शेतकऱ्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण […]