ताज्याघडामोडी

सावधान! SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना अलर्ट; Fake क्रमांकावर कॉल करू नका अन्यथा नुकसान अटळ

डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर भामट्यांपासून सतर्क केले आहे.

नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहबकांना एक फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे.

एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. एसबीआयच्या अडचणी किंवा सेवांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील क्रमांकावरच संपर्क करा. या शिवाय बँकेच्या खात्याची माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

एसबीआयने म्हटले की, जर खोट्या कस्टमर केअर क्रमांकामुळे तुमच्याबाबत चुकीचे घडले असेल तर, [email protected] वर तुमची तक्रार नोंदवा. किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 या क्रमांकावर कॉल करा.

तुम्ही बनावट किंवा खोट्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केल्यास, सायबर भामटे तुमच्या बँक खात्याची आणि ओटीपीची माहिती घेऊन ऑनलाईन पैसे चोरू शकतात. त्यामुळे कोणालाही फोनवर तुमच्या खात्याचे तसेच डेबिट क्रेडिट कार्डचे डिटेल शेअर करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *