दिवाळीआधी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे दिवाळीला जाणाऱ्या चाकरमन्यांची धाकधूक वाढली होती. एसटी कामगारांनी जोरदार घोषणा देत संप पुकारला होता. त्यानंतर परिवहनमंत्री यांनी बैठक घेऊन कामगारांच्या मागण्या ऐकल्या. विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगारांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला आहे. […]
ताज्याघडामोडी
पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहणार बँका, तपासा सुट्ट्यांची यादी
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातच दिवाळी आहे. या महिन्यातही भरपूर बँक हॉलिडे असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका पुढच्या महिन्यात बंद राहणार आहेत. दरम्यान पुढील दोनच दिवसात सुरू होणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आठवडाच सुट्ट्यांनी भरलेला आहे. 2 नोव्हेंबरपासूनच काही राज्यात सुट्ट्यांना सुरुवात होत आहे. गोवर्धन पूजेची सुट्टी यादिवशी असणार आहे. या आठवड्यात गोवर्धन पूजा, […]
पुढील काही दशके केंद्रात भाजपाची सत्ता
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा दावा केला होता. तसंच घडलं. निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. आता प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशकं हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर […]
लग्नानंतर सातव्या दिवशी नववधू पैसे आणि दागिने घेऊन पसार
लग्नानंतर सात दिवस सोबत राहिलेली नववधून पैसे आणि दागिने घेऊन पळून दिल्यामुळे नवरदेवाला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या नववधूनं पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिला होता. लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली.राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबुरामचं शांती नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं […]
अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीकडून छापेमारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. अजित […]
मोठी बातमी! क्रूझ ड्रग्स प्रकरणात CDR काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर; हॅकर मनीष भंगाळे यांचा दावा!
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे मोबाईल सीडीआर आणि प्रभाकर साहील नावाने डुप्लिकेट सीम कार्ड काढण्यासाठी, आपल्याला अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोन जण जळगावात येऊन भेटले. एवढेच नाही, तर यासीठी त्यांनी आपल्याला 5 लाखांची ऑफरही दिली होती, असा खळबळजनक दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. तसेच, यासंदर्भात […]
पंढरपूर नगर पालिकेत ३ नगरसेवक वाढणार ?
नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे गरजेचे असून केवळ २०२१ च्या जनगणनेची आकडेवारी अधिकृतरित्या प्राप्त झाली झाली म्हणून नगर पालिका अथवा महानगर पालिकांच्या क्षेत्रातील जनतेला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित ठेवणे आयोग्य होणार असल्याचे गृहीतक मांडून नगर पालिका व महानगर पालिका यांची सदस्य संख्या वाढविणे गरजेचे आहे हे मान्य करत आज लोकसंख्या वाढीचा […]
सहकारी साखर कारखान्यांवर आता आयकराची टांगती तलवार नाही!
गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तीकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. साखर कारखान्यांकडून शेतकर्यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या […]
आता वीज बिल केवळ पाच हजार रुपयेच रोखीने रता येणार, महावितरणचा निर्णय
महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना 1 नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर 1 नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात […]
BJP च्या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरू होतं लैंगिक शोषण
आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे, […]











