ताज्याघडामोडी

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीकडून छापेमारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने काल (7 ऑक्टोबर 2021) छापेमारी केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती.

अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली. यासोबत अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी केली. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवारांनी म्हटलं होतं, ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील.

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखाना आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या सगळ्या आरोपांना सुमारे तासभर पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिली. राज्यात गेल्या पंधरा वर्षांमध्ये जवळपास 65 साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने लिलावाद्वारे विक्री केली तर अकरा कारखाने हे भाडेतत्वावर चालवायला दिले असल्याचे सांगत केवळ अजित पवार यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या कारखान्यांवर बेछूट आरोप होत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप खोटा

अजित पवारांनी म्हटलं, साखर कारखान्याच्या संदर्भाने बरेच दिवस बातम्या येतात म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर काही सांगावं म्हणून मी बोलायचं ठरवलं. आता आरोप अती होत आहेत. साखर कारखान्याबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करुन काहीही निष्पन्न झालेलं नाही. साखर कारखान्याबाबत खोटी आकडेवारी सादर करुन आरोप केले जात आहेत. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, हा आरोप खोटा आहे.

अजित पवार म्हणाले, जरंडेश्वर 66 कोटी 77 लाखला गुरू कमोडिटी मुंबई यांनी विकत घेतला. नंतर BVG च्या हनुमंत गायकवाड यांनी तो कारखाना चालवला त्यांना तोटा आला म्हणून त्यांनी दुसऱ्या कंपनीला विकला. जरंडेश्वरच नाव घेऊन माझ्या नातेवाईकांच्या नावाने टीका केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *