ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेत ३ नगरसेवक वाढणार ?

नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे गरजेचे असून केवळ २०२१ च्या जनगणनेची आकडेवारी अधिकृतरित्या प्राप्त झाली झाली म्हणून नगर पालिका अथवा महानगर पालिकांच्या क्षेत्रातील जनतेला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित ठेवणे आयोग्य होणार असल्याचे गृहीतक मांडून नगर पालिका व महानगर पालिका यांची सदस्य संख्या वाढविणे गरजेचे आहे हे मान्य करत आज लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेत नगरसेवकांच्या संख्येत जवळपास १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे

.’ब’ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल यावर आज शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते.पंढपुर नगर पालिका हि ब वर्ग नगर पालिका असून त्यामुळे आगामी नगर पालिका निवडणुकीत नगरसेवकाची संख्या ३ ने वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *