गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर सातव्या दिवशी नववधू पैसे आणि दागिने घेऊन पसार

लग्नानंतर सात दिवस सोबत राहिलेली नववधून पैसे आणि दागिने घेऊन पळून दिल्यामुळे नवरदेवाला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या नववधूनं पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिला होता. लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली.राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबुरामचं शांती नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर बाबूरामच्या घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही आश्चर्य वाटलं होतं.

लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला शांतीनं नकार दिला होता. त्यासाठी काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यात संबंध नव्हते. आपल्या पत्नीचं लवकरच मनपरिवर्तन होईल आणि सगळं काही सुरळीत होईल, या प्रतिक्षेत बाबूराम होता.लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत हॉस्पिटलमध्ये जाण्याची विनंती तिने केली. मात्र हॉस्पिटलमध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला फोन लावण्याचे प्रयत्न केले, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला सत्य समजलं. घरातील पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पोबारा केल्याचं त्याच्या लक्षात आलं.

पत्नीने दगा दिल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय त्याने घेतला. लग्न करून सामान्यांना लुबाडणाऱ्या टोळीचा हा प्रताप असावा, असा पोलिसांना संशय आहे. मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यताही वर्तवण्यात असून केवळ पैसे आणि दागिने लुटून नेण्याच्या बहाण्याने हे लग्न झालं असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *