तुम्ही सणावाराच्या काळात जो खवा खाल्ला तो बनावट तर नव्हता ना? हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण केज पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे. केज जवळ असलेल्या उमरी येथे केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात […]
ताज्याघडामोडी
पराग डेअरी उद्योग समुहावर आयकर विभागाचे छापे
पुण्याच्या आंबेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घर आणि उद्योग-व्यवसायांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाची छापेमारी ही सध्या सुरुच आहे. एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शहा हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. आयकर विभागाच्या चार पथकांकडून चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई पुणे जिल्ह्यातील […]
८ वर्षीय मुलाला पंख्याला उलटं टांगून बेदम मारहाण
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलासोबत असं काही केलं, की त्याबाबत समजल्यानंतर परिसरातील सर्वांनाच धक्का बसला. छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगलं आणि त्याला बेदम मारहाण केली. शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने त्याला मारहाण केली. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण […]
कु.अशिष आदिनाथ ढेकळे यांनी शेतकर्यांसाठी केली शितगृहाची उभारणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथील कृषि पदविचे शिक्षण घेत असणारा कृषिदूत कु.अशिष आदिनाथ ढेकळे (पंढरपूर) यांनी शेतकर्यांसाठी खास कमी खर्चामध्ये फळे व भाज्या टिकवून ठेवण्यासाठी शितगृहाची उभारणी केली. श्री राजेंद्र जाधव यांच्या घरी शितगृह उभारण्यात आले व त्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम करण्यात आले. कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत अशिष ढेकळे […]
सोलापूर जिल्ह्यातील ५ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, २१ डिसेंबरला मतदान
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक निवडणुकींची रणधुमाळी संपली. सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे. ओबीसी आरक्षण अध्यादेशानंतरची पहिली निवडणूक स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून […]
‘कामावर रुजू व्हा, अन्यथा…’; परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देत पगारवाढीचा निर्णय घेणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीच्या घोषणेनंतर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. जे कर्मचारी निलंबित झाले आहेत, ते कामावर हजर झाल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल, असे परब यांनी जाहीर केले आहे. मात्र, ही घोषणा करतानाच त्यांनी कामावर येऊ न इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक […]
पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ५ विद्यार्थ्यांची “जेन वाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” हि आयटी सोल्युशन्स देणारी बावधन, पुणे येथील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २०१३ साली झाली असुन कंपनीचे मुख्य ऑफिस न्यूजर्सी, अमेरिका येथे […]
अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा देखील राज्य सरकारला सामना करावा लागत होता. इतर मागण्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं […]
पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याचे काम झाले सुरू युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका
पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याचे काम झाले सुरू युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका पंढरपूर – पंढरपूर – ओझेवाडी या रस्त्याच्या कामासाठी टेंडर निघाले, वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते. याबाबत सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे […]
दोन आरटीओ एजंट लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
आरटीओ कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्राहकांना स्वत:च्या कामासाठी एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीपर्यंत चकरा माराव्या लागतात.सामान्य नागिरक आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेला असता नियमावर बोट ठेवत अनेक त्रुटी काढत यास हेलपाटे दिले जातात असा अनुभव अनेकांना आला आहे.त्यामुळे साहजिकच अनेक सामान्य नागिरकांना दलालाशी संधान बांधून आपली कामे करून घ्यावी लागत असल्याचेही अनेक वेळा निदर्शनास येते.मात्र यातूनच कधी अवास्तव पैशाची मागणी होते […]











