वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथील कृषि पदविचे शिक्षण घेत असणारा कृषिदूत कु.अशिष आदिनाथ ढेकळे (पंढरपूर) यांनी शेतकर्यांसाठी खास कमी खर्चामध्ये फळे व भाज्या टिकवून ठेवण्यासाठी शितगृहाची उभारणी केली. श्री राजेंद्र जाधव यांच्या घरी शितगृह उभारण्यात आले व त्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम करण्यात आले. कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत अशिष ढेकळे यांनी शेतकर्यांना आधुनिक पद्धतीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करवा हे सांगितले. मातीच्या विटा यांच्या साह्याने कुंड तयार करून कृषी कापड तयार करून त्यामधे फळे व पालेभाज्या ठेवावे व त्यानंतर ओले पोते करून झाकून ठेवावे. त्यामुळे फळे व पालेभाज्या ४-५ दिवस खराब होणार नाहीत, त्यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान टळेल असे कृषीदूत अशिष ढेकळे यांनी सांगितले.
याचा वापर आधुनिक काळासाठी अधिकाधिक शेतकर्यांनी करावा असे आव्हानही कृषीदूत अशिष ढेकळे यांनी केले. याप्रसंगी श्री. राजेंद्र जाधव श्री.विकास जाधव , श्री.आदिनाथ ढेकळे श्री.दादासो ढेकळे श्री.बबन नरसाळे हे शेतकरी व गावातील इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
