ताज्याघडामोडी

पराग डेअरी उद्योग समुहावर आयकर विभागाचे छापे

पुण्याच्या आंबेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घर आणि उद्योग-व्यवसायांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाची छापेमारी ही सध्या सुरुच आहे. एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शहा हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.

आयकर विभागाच्या चार पथकांकडून चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये आयटीची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने आतापर्यंत शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने आयटीची कारवाई सुरु असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

आयकर विभागाच्या एका पथकाने आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास मंचर येथील पराग डेअरीवर छापा टाकला. तर दुसऱ्या पथकाने अवसरी येथील पीर डेअरीवर पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर तिसऱ्या पथकाने आज सकाळी सात वाजता थेट देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी छापा टाकला.

तर चौथा छापा हा देवेंद्र शहा यांच्या मित्राच्या घरी सकाळी नऊ वाजता टाकल्याची माहिती आहे. आयटीकडून कार्यालयांची देखील झडती सुरु आहे. याशिवाय छापेमारी देखील सुरुच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *