ताज्याघडामोडी

दोन आरटीओ एजंट लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 

आरटीओ कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्राहकांना स्वत:च्या कामासाठी एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीपर्यंत चकरा माराव्या लागतात.सामान्य नागिरक आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेला असता नियमावर बोट ठेवत अनेक त्रुटी काढत यास हेलपाटे दिले जातात असा अनुभव अनेकांना आला आहे.त्यामुळे साहजिकच अनेक सामान्य नागिरकांना दलालाशी संधान बांधून आपली कामे करून घ्यावी लागत असल्याचेही अनेक वेळा निदर्शनास येते.मात्र यातूनच कधी अवास्तव पैशाची मागणी होते आणि नाही दिले तर अडवणूक केली जातेही असेही दिसून येते.

    असाच अनुभव एका प्रवासी बस चालकास आला असून जळगाव जिल्ह्यातील खेडी येथील एका वाहन मालकास फिटनेस सर्टिफिकेट साठी १० हजाराची मागणी करण्यात आली.या बाबत सदर वाहन मालकाने लाचलुचपत विभागाशी संर्पक करत तक्रार दाखल केली.या नंतर आरटीओ कार्यालयाच्या आवारातच १० हजाराची रक्कम स्वीकारताना दलाल शुभम राजेंद्र चौधरी व राम भीमराव पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०३२२/२०२१, दि.२४/११/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *