ताज्याघडामोडी

50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, केंद्र सरकारची नवी नियमावली

कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही वाढत आहे. यापुढे कोणताही धोका नको म्हणून केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार 50 टक्के कर्मचारी कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक येथील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, विवाहितेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खंडणी मागणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक

खंडणी मागितल्याप्रकरणी तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली आहे. नवनाथ नरसिंगराव तनपुरे असे अरोपीचे नाव असून, शाहू रमेश गांगर्डे (रा. निमगाव गांगर्डा) यांनी फिर्याद दिली आहे. शाहू गांगर्डे या इलेक्ट्रिक ठेकेदाराला वडगाव तनपुरत् ग्रामपंचायतने दलित वस्तीत पथदिवे बसवण्याचे काम दिले होते. मात्र, कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणुन संबंधित माजी ग्रामपंचायत सदस्य […]

ताज्याघडामोडी

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं कोसळलं?; अखेर सत्य आलं समोर!

देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दुर्घटनेमागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष काढला गेल्याचे सांगण्यात येत आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने आपला अहवाल कायदा विभागाकडे पाठवला असून येत्या आठवड्यात हा अहवाल हवाईदल प्रमुखांकडे […]

ताज्याघडामोडी

सुरू होण्याआधीच मोडला संसार; लग्नानंतर आठ दिवसांत तरुणाची आत्महत्या

हिंगोलीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तरुणाचं आठ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसाराची घडी बसण्याआधीच आकाशने आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या वंजारवाडी शिवराममधील शेतात असलेल्या आखाड्यावर एका लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन हिंगोलीच्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली […]

ताज्याघडामोडी

रेशन दुकानदाराकडून लाख रुपये लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहाथ सापडला

स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य पुरवठा करता यावा म्हणून हि यंत्रणा अमलात आणली गेली.स्वस्त धान्य पुरवठ्या साठी केंद्र व राज्य सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रुपये खर्च करते.मात्र पुरवठा विभागाला भ्रष्टाचाराची मोठी कीड लागली असून काही भ्रष्ट आणि राजकीय नेत्यांचा आशीवार्द असलेले स्वस्त धान्य दुकानदार भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मदतीने गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून […]

ताज्याघडामोडी

राज्यात लॉकडाऊनचा लावणार नाही, पण निर्बंध वाढणार; राजेश टोपे यांची माहिती

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वार काढलं आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातारण आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

८२० रुपयासह सापडलेला एजन्ट म्हणाला मीच बुकी मालक !

पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई,गुन्हा दाखल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत बोकाळलेल्या अवैध धंद्याबाबत आवाज उठवला खरा पण तो केवळ मंगळवेढा शहर तालुक्यापुरताच असल्याचे लक्षात आल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात मटका,अवैध वाळू उपसा,अवैध दारू विक्री असले कुठलेही प्रकार सुरु नसावेत अशी आमदार आवताडे यांची पटली असावी अशीही खुमासदार चर्चा पंढरपूर शहर तालुक्यात होताना […]

ताज्याघडामोडी

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, रचला आत्महत्येचा बनाव

आपल्या प्रियकराला सोबत घेत पतीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेनं त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या प्रियकराची मदत घेत पतीवर खुनी हल्ला केला. त्यात पती ठार झाल्यावर तिने बनाव रचला आणि पतीने आत्महत्या केली, असं दाखवलं. मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच. काय […]

ताज्याघडामोडी

जानेवारीत 16 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवसच उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यासाठी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये जानेवारी 2022 मध्ये बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. जर तुम्हाला जानेवारी महिन्यात बँकेशी संबंधित कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासली पाहिजे. जानेवारी महिन्यात 4-6 दिवस नव्हे तर संपूर्ण […]