गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खंडणी मागणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक

खंडणी मागितल्याप्रकरणी तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली आहे. नवनाथ नरसिंगराव तनपुरे असे अरोपीचे नाव असून, शाहू रमेश गांगर्डे (रा. निमगाव गांगर्डा) यांनी फिर्याद दिली आहे.

शाहू गांगर्डे या इलेक्ट्रिक ठेकेदाराला वडगाव तनपुरत् ग्रामपंचायतने दलित वस्तीत पथदिवे बसवण्याचे काम दिले होते. मात्र, कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणुन संबंधित माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तनपुरे याच्याकडून पैशाची मागणी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने ठेकेदार गांगर्डे यांनी त्याची भेट घेऊन कामाविषयी माहिती दिली होती.

परंतु एक महिन्यापूर्वी काम पुर्ण झाल्यावर तनपुरे याने गट विकास अधिकाऱयांकडे तनपुरे याने तक्रार अर्ज दिल्याची माहिती गांगर्डे यांना मिळाली. त्यांनी पंचायत समितीच्या आवारात 18 डिसेंबर रोजी तनपुरे याची भेट घेऊन ‘मी नियमाप्रमाणे काम केले असून, तुम्ही केलेला अर्ज मागे घ्या’, अशी मागणी केली.

यावर तनपुरे याने अर्ज मागे घेण्यासाठी 10 हजारांची मागणी केली. पैसे दिले तरच अर्ज मागे घेतो; अन्यथा वरिष्ठांपर्यंत तक्रार करून बिल निघु देणार नाही, असे तनपुरे याने सांगितले. त्यामुळे गांगर्डे यांनी तनपुरे याला 2 हजार रुपये दिले.

दरम्यान, तनपुरे याने तीन दिवसांनी गांगर्डे यांना फोन करून उर्वरित पैशांची मागणी केली. प्रतीक तनपुरे याचा मोबाईल नंबर देऊन त्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यावर गांगर्डे यांनी 3 रुपये हजार ट्रान्सफर केले.

त्यानंतर पुन्हा कर्जत येथे भेट झाली असता ‘उरलेले 5 हजार देऊन टाक’ असे तनपुरे म्हणाला; परंतु ‘मी पैसे देऊ शकत नाही’ असे गांगडे म्हणाले. त्यावर ‘तु तुझे बिल कसे काढतो तेच पाहतो’, अशी धमकी तनपुरे याने दिली. त्यामुळे शाहू गांगर्डे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *