ताज्याघडामोडी

राज्यात लॉकडाऊनचा लावणार नाही, पण निर्बंध वाढणार; राजेश टोपे यांची माहिती

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वार काढलं आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातारण आहे.

31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नसल्याचं सांगितलं. पण कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

राजेश टोपे काय म्हणाले?

लॉकडाऊनचा सध्या विचार नाही, पण निर्बंध वाढणार आहेत. राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत काम सुरु झालं आहे. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते. रुग्णालयांना किट्स वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉन आणि डेल्टा रुग्णांना ओळखणं गरजेचं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणं गरजेच आहे. हे सर्वांसमोरील एक आव्हान असेल. रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य आहे. डेल्टा आणि ओमयाक्रॉन रुग्णांचे प्रमाण समजणे गरजेच आहे. राज्यात सर्व ठिकाणी टेस्टिंग सुरु आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 10 च्या आसपास गेला आहे.

मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. मेट्रो शहरांमध्ये निर्बंध अधिक कठोर असू शकतात. सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनची भीती बाळगू नये. पण रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल, असे टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन तासांची बैठक झाली. यामध्ये लॉकडाऊनवर चर्चा झाली नाही. इतक्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. पण निर्बंधावर भर दिला जाणार आहे. राज्यात आज 12 ते 15 हजारांच्या आसपास रुग्णसंख्या आढळण्याची शक्यता आहे. तसेच बेड व ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सध्या सिनेमा, रेस्टॉरंटवर निर्बंध लावण्याबाबत कोणताही विचार केला नाही. लहान मुलांच्या लसीकरणाची स्ट्रॅटेजी तयार करायची आहे. त्याबाबत प्रशासनाची बैठक झाली. पोलीस, डॉक्टर आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व निर्णय योग्य पद्धतीने व्हायला हवेत. प्रत्येक विभागात एसजीएन किट वापरली तरच ओमायक्रॉनचे प्रमाण समजू शकतो, असे टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *