एका रिक्षा चालकाने ऑन ड्यूटी वाहतूक पोलिसावर लोखंडी सळईने हल्ला केल्याची घटना ११ जानेवारीला रात्री घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राकेश घाडगे असं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून खारघर पोलीस हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच […]
ताज्याघडामोडी
४१ दिवसांच्या उपवासानंतर अजय देवगणने घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन
सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व्यस्त आहे. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले त्याचे काही फोटो बरेच चर्चेत आहे. नुकतेच केरळच्या सबरीमाला मंदिराला भेट देत भगवान अयप्पा यांचे अजय देवगणने दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर अजयचे हे फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या मंदिरात जाण्याआधी करावे लागणारे ४१ […]
मजूर संचालक आ.प्रवीण दरेकरांना अजित पवार यांचा दे धक्का
भाजपला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षीय निवडीमध्ये भाजपचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील […]
मनसेला आणखी एक धक्का
काही दिवसापूर्वी पुण्यातील डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत मनसेला मोठा धक्का दिला होता.आता पुन्हा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा मनसेला मोठा धक्का मानला जातो. आज ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे […]
पंढरपूरात गणेश महाराजांनी सांगितले,दोन नंबरचे सोने निम्म्या पैशात मिळतंय !
गळ्याला कोयते लावल्याने अंगावरील सोने,रोख रक्कम देऊन आले पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तरुण एका शोरूम मध्ये काम करत असून वाखरीतीलच एकजण व अनवली हे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत.काही दिवसापूर्वी फिर्यादी यांचेसोबत पंढरपुर मध्ये असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती.त्यावेळी गणेश महाराज नामक एका व्यक्तीने या तिघांना सांगतिले कि एका महिलेचा फोन येत आहे.दोन […]
मर्डरचा बदला डबल मर्डरने,गुंडाबरोबर त्याच्या बापाचीही हत्या
लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याची हल्लखोरांनी गोळीबार करत हत्या केली होती.या खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.प्रथमेश उर्फ सनी […]
निवृत्त पोलिसाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न, सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला विष पाजून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा.शेंडी बायपास, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गिन्यादेव नामदेव जाधव (वय 60, मुळ रा. बोल्हेगाव, ता. नगर, सध्या रा. पाथर्डी) यांनी […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) […]
खा.शरद पवार यांची भेट घेत अभिजित पाटील यांनी दिली सांगोला कारखान्याच्या गाळपाची माहिती
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे भेट घेऊन सांगोला साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सविस्तर माहिती दिली.जवळपास ९ वर्षे बंद असलेल्या हा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतल्यानंतर अभिजित पाटील यांनी अवघ्या केवळ अडीच महिन्यात हा कारखाना गाळपास सज्ज केला.चालू गळीत हंगामात या कारखान्याचे […]
‘काका‘ खरंच बंड करणार ? परिचारक विरोधी आघाडीत सामील होणार ?
पंढरपूर नगर पालीकेच्या भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भुषविलेल्या नगराध्यक्षा म्हणून ज्यांची नगर पालीकेच्या राजकीय इतिहासात नोंद झाली आहे व भविष्यात इतक्या दिर्घकाळ नगराध्यक्ष पद कुणाला भुषविण्यास मिळेल अशी शक्यता नसल्याने 29 डिसेंबर रोजी साडेसात वर्षे व 15 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण करुन माजी नगराध्यक्षा साधना भोसले या कार्यकाळ संपुष्टात आल्याने पदावरुन बाजुला झाल्या आहेत. […]











