ताज्याघडामोडी

खा.शरद पवार यांची भेट घेत अभिजित पाटील यांनी दिली सांगोला कारखान्याच्या गाळपाची माहिती

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  मुंबई येथे भेट घेऊन सांगोला साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सविस्तर माहिती दिली.जवळपास ९ वर्षे बंद असलेल्या हा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतल्यानंतर अभिजित पाटील यांनी अवघ्या केवळ अडीच महिन्यात  हा कारखाना गाळपास सज्ज केला.चालू गळीत हंगामात या कारखान्याचे आज अखेर सांगोला सहकारी साखर कारखान्याने आज पर्यतच्या आकडेवारीनुसार १ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप करत  सरासरी १०.६७ टक्के अशी रिकव्हरी प्राप्त केली  असून सांगोला साखर कारखान्याच्या वाटचाली बाबत खा.शरद पवार यांनी या भेटीत समाधान व्यक्त केले असून या भेटीत पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्या बाबत खा.शरद पवार यांनी चिंता व्यक्त केल्याचे समजते. 

 

    राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्याने मोठी बाजी मारली आहे.डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत उस्मानाबाद नांदेड अशा दूर अंतरावरील जिल्ह्यातील बंद अवस्थेतील साखर कारखाने भाडेतत्वावर घेत हे साखर कारखाने यशस्वी पणे चालवून आदर्श प्रस्थापित केला होता.मात्र सांगोला साखर कारखान्याच्या रूपाने अभिजित पाटील यांची जिल्ह्यातील साखर कारखानदारीत एंट्री झाली आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आज पंढरपूर तालुक्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा देताना दिसून येऊ लागला.या कारखान्याच्या वाटचाली बाबतची माहिती घेत,क्रशिंगची,साखर पोती उत्पादनाची आकडेवारी या भेटीत उत्सुकतेने जाणून घेत समाधान व्यक्त केल्याचे समजते.   

 

 तर याच भेटीत पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सध्यस्थिती व भवितव्य या बाबतही खा.शरद पवार यांनी चिंता व्यक्त केल्याचे समजते.सांगोला साखर कारखाना सुरु झाल्यामुळे ‘विठ्ठल’ च्या ऊसउत्पादक सभासदांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पंढरपूर तालुक्यात उपलब्ध असलेली सिंचन सुविधा,नदीकाठचा मोठा परिसर यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.त्यामुळे विठ्ठल कारखाना बंद राहणे हि पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाच्या आणि सभासद उसउत्पादकांच्या दृष्टीने मोठी हानीकारक ठरणार आहे.  या भेटीत झालेल्या चर्चेबाबत अभिजित पाटील यांच्याकडून तपशीलवार माहिती मिळाली नसली तरी या भेटीत  सांगोला कारखाना आणी विठ्ठल कारखाना हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता अशी माहिती देण्यात आली आहे.   

 

       अभिजित पाटील आणि त्यांनी अवसानयात  निघालेल्या,बंद पडलेल्या  ४ साखर साखर कारखान्यास दिलेली उर्जितावस्था यामुळे राष्ट्रवादीच्या विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्यांची जाहीर कार्यक्रमात प्रशंसा होताना दिसून येत आहे.अशातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा एक सभासद म्हणून गेल्या २ वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची झालेली आर्थिक बिकट अवस्था आणि ‘विठ्ठल’ च्या पदाचा वापरकेवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून केल्याने कारखान्यावर झालेला कर्जाचा बोजा या बाबत सातत्याने आवाज उठवला आहे.या गाळप हंगामात विठ्ठल कारखाना बंद राहिल्यामुळे सभासदांमध्ये मोठी अस्वस्थता असून अर्थकारण गोत्यात येणार असेल तर राजकारण कशासाठी करायचे असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.

 

अशातच आज अभिजित पाटील आणि खा.शरद पवार यांच्यात ‘विठ्ठल’ बद्दल चर्चा झाल्याचे समजताच ‘विठ्ठल’ ला अच्छे दिन येण्याची आशा बाळगून असलेल्या अनेक सभादांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून शरद पवार विठ्ठल च्या पुढील वाटचाली बाबत काय म्हणाले हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.तर ९ वर्षे बंद अवस्थेतील सांगोला साखर कारखाना अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ४ महिन्यात गाळपास सज्ज होतो व आता दोन लाख गाळपाच्या दिशेने वाटचाल करत आहे.मग ते सभासद असलेल्या ‘विठ्ठल’ बाबत ते कसे कमी पडतील असा सवाल उपस्थित करत वेळीच ‘विठ्ठल’ बाबत योग्य निणर्य घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.           

        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *