

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती.या खून प्रकरणी सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती.मात्र पुढे तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री त्याच्या कारमधून तो आणि त्याचे वडील लोणीकंद येथून शिंदे वस्ती कडे निघाले होते. त्यावेळी सफारी कारमधून पाच ते सहाजण आले.
त्यांनी सनी शिंदे याला अडवलं. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार सुरू केले.यावेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर देखील वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले.