ताज्याघडामोडी

मनसेला आणखी एक धक्का

काही दिवसापूर्वी पुण्यातील डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत मनसेला मोठा धक्का दिला होता.आता पुन्हा  मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले  राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा मनसेला मोठा धक्का मानला जातो. आज ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अतुल वांदिले म्हणाले, मनसे पक्ष विदर्भात वाढला नाही ही खंत आहे. आमची नाराजी राज ठाकरे यांच्यावर नाही. तर नाराजी ही दुसऱ्या फळीतील नेत्यावर आहे. दुसऱ्या फळीतील नेते कधीच आमच्याकडे दौरे करत नाहीत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम दिला जात नव्हता. मग अशा ठिकाणी थांबून उपयोग नाही, अशी कार्यकर्त्याची भावना होती. त्यामुळं राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अतुल वांदिले हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती.मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खालची फळी हे पक्ष वाढीसाठी मदत करत नव्हते.मुळे पक्षातील कार्यकर्ते आणि जनतेचा कौल लक्षात घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *