ताज्याघडामोडी

राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी शिवशक्ती सेनेत प्रवेश करणार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांच्या पत्नी  करुणा धनंजय मुंडे यांच्या नव्या पक्षाची स्थापना करोनामुळे लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांनी आज नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असे मुंडे यांनी सांगितले. त्या […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे केली हत्या

पत्नीवर वाकडी नजर टाकल्याने एका माणसाने आपल्याच मित्राची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. या घटनेमुळे कानपूर हादरून गेले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. भैरोघाट येथे ही घटना घडली. विपिन निगम असे अरोपीचे तर सुनिल सिंह असे मृत माणसाचे नाव आहे. दोघेही चांगले मित्र होते. मात्र पत्नीबद्दल सतत घाणेरडे वाक्य बोलणे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चोर समजून ऑटोचालकाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दामू नगर येथील ऑटो चालक शाहरुख शेख याला काही गुंडांनी चोर समजून बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेले आणि मेडिकल करून त्याला घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी शाहरुखचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चोर समजून ऑटोचालकाला बेदम […]

ताज्याघडामोडी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तान अर्थसहाय्यित खोटी वृत्त नेटवर्क केली ब्लॉक

 डिजिटल मीडियावर समन्वित पद्धतीने भारतविरोधी बनावट वृत्त पसरवण्यात गुंतलेल्या 35 यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब खात्यांची एकूण सदस्य संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक आहे आणि त्यांच्या  व्हिडिओजना 130 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. याव्यतिरिक्त, इंटरनेटवर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्यात समन्वित […]

ताज्याघडामोडी

झोप पूर्ण न झाल्यानं रेल्वे चालवण्यास चालकाचा नकार; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

वाहन चालवताना कधी चालकाला झोप आली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा चालक झोप आली असेल तर गाडी बाजूला घेऊन काही वेळ आराम करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का ट्रेन चालकाला झोप आली म्हणून ट्रेन एकाच ठिकाणी थांबली आहे? नाही ना, पण हे झालंय. उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी अजब गजब प्रकार पाहायला […]

ताज्याघडामोडी

येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. यासोबतच पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर […]

ताज्याघडामोडी

‘मी आत्महत्या करतोय’, स्वत:च स्वतःला श्रद्धांजली वाहिली, गळफास घेऊन शिक्षकाने आयुष्य संपवलं!

सचिन अंबुलगे हे देवणी येथील रहिवासी असून ते गत काही वर्षांपासून चाकुर येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत क्रीडा शिक्षकपदी कार्यरत होते. ते क्रीडा शिक्षक म्हणून गेली 20 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत होते. त्यांची पहिली जॉइनिंग वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली क्रीडा शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्रशाला बोरोळला झाली होती. त्यानंतर 5 वर्ष प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोक्कांतर्गत कारवाईची धमकी देत 10 लाखांची लाच घेतली, कोल्हापुरात दोन कॉन्स्टेबल गजाआड

तक्रारदाराच्या मुलाला दोन दिवस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत बसवून मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 10 लाखांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कॉन्स्टेबलला जेरबंद करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयालगत या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदारनगर मोरेवाडी, दोघे ता. करवीर) […]

ताज्याघडामोडी

प्रेमाचे गोड गोड मेसेज पाठवून ही तरुणी कमावते लाखो रुपये!

एखाद्या कामाचा भरपूर मोबदला हवा असेल तर त्यासाठी पुष्कळ मेहनत करावी लागते. पण, जर कुणाला फक्त प्रेमाचे मेसेज पाठवून महिन्याला दीड लाख रुपये मिळत असतील तर? हे काम करणारी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने एक व्हिडीओ प्रसारित करत आपल्या या अनोख्या कमाईच्या साधनाचा उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार गेली तीन वर्षं […]