ताज्याघडामोडी

‘मी आत्महत्या करतोय’, स्वत:च स्वतःला श्रद्धांजली वाहिली, गळफास घेऊन शिक्षकाने आयुष्य संपवलं!

सचिन अंबुलगे हे देवणी येथील रहिवासी असून ते गत काही वर्षांपासून चाकुर येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत क्रीडा शिक्षकपदी कार्यरत होते.

ते क्रीडा शिक्षक म्हणून गेली 20 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत होते. त्यांची पहिली जॉइनिंग वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली क्रीडा शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्रशाला बोरोळला झाली होती. त्यानंतर 5 वर्ष प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला साकोळ आणि सध्या ते जिल्हा परिषद प्रशाळा चाकूर येथे कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक विध्यार्थी स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत खेळात पुढे गेले आहेत.

मात्र गुरुवारी रात्री उशिरा सचिन अंबुलगे यांनी चाकुर येथील आदर्श कॉलनीमध्ये गणपती रोकडोबा जगताप यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यापासून ते तणावात होते. ‘मी आत्महत्या करणार आहे’ असे स्टेटस ते व्हाट्सअपला ठेवत तसेच काही ग्रुपवरही ते अशाच प्रकारचा मेसेज फॉरवर्ड करत. या पूर्वीही रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली पोलिसांना आढळून आली. आपले पैसे व संपत्ती मुलाला मिळावी व मुलाचे संगोपन आईने करावे असे सचिन यांनी त्या चिठीमधे नमूद केले आहे.

सचिन अंबुलगे यांचा भाऊ रविंद्र शिवराज अंबुलगे (रा.देवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन अंबुलगे यांचे चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून देवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बालाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शिवाजी गुंडरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *