धनगर समाजाला बिहार, झारखंड आदी राज्यात एस. टी. चा दर्जा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात केवळ ‘स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगरचे ‘धनगड’ झाले असून महाराष्ट्रात धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे. तसेच दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामाजिक […]
ताज्याघडामोडी
पुण्यात तरुणीची आत्महत्या
हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी […]
आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या
सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे, पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी […]
”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच
विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]
फास्टॅगच्या नियमात ‘मोठा’ बदल
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅमध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट समाप्त केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये आणि फास्टॅगचा वापर वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. फास्टॅग वॅलेट काढतेवेळी डिपॉझिट ठेवले जाते. त्याच बरोबर वाहन धारकाला किमान रक्कम ठेवण्याची अट बॅंकाकडून घालण्यात येत आहे. आता किमान रकमेची अट रद्द करण्यात आली आहे. प्राधिकरणाने म्हटले […]
एफआरपी थकवलेल्या साखर कारखान्याचे संचालक ठरणार सरकारी थकबाकीदार ?
राज्यात साखर कारखाने सुरू होऊन 4 महिने उलटून गेले. तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम न देता मोडतोड करून शेतकर्यांना रक्कम दिलेली आहे. तसंच गतवर्षीची एफआरपीची रक्कम अद्यापही काहींनी दिलेली नाही. या सर्व साखर कारखान्यांवर तातडीने साखर जप्तीची कारवाई करावी,’ अशी मागणी […]
देवकार्य करण्याचा बहाणा करून महिलेचा निर्घृण खून
देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून […]
पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण- प्रांताधिकारी-सचिन ढोले
पंढरपूर, दि. 09:- फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी दिनांक 1 ते 10 फेब्रुवारी […]
पूरग्रस्त निधी तातडीने जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू बळीराजाचा इशारा
पंढरपूर तालुक्यातील गेल्यावर्षी भीमा नदीला आलेल्या महापुराने सुमारे 700 नुकसानग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वंचित आहेत व यावर्षी ही अवकाळी व महापुरामुळे नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी पंचनामे होऊन सुद्धा वंचित आहेत पंढरपूर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलआहे एकीकडे निधी दिला म्हणून सरकार पाठ थोपटून घेत असताना पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मात्र […]
ग्राहक बनून आला अन् सोन्याचा बॉक्स घेऊन पसार झाला…
मुंबई: कांदीवली परिसरातील एका सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक व्यक्ती सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आला आणि सोन्याचा बॉक्स घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी कांदीवलीतील चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या चोराचा तपास घेत आहेत. कांदीवलीच्या चारकोप परिसरातील भारत भूषण इमारतीतील पद्मावती ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती ग्राहक बनून आला. […]











