मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या हा दौरा काही कारणामुळे स्थगित करण्यात आलाय. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांचा हा अयोध्या दौरा स्थगित […]
ताज्याघडामोडी
स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्तांकडून 50 कोटींचा अपहार
पुण्यातील वकीलाने केली पोलिसात तक्रार त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्त, अध्यक्ष, संचालक व सदस्यांनी भाविकांच्या तब्बल 50 काेटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक आराेप पुणे येथील एका वकीलाने केला आहे. या संदर्भात जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वकीलनाने न्यायालयासह, ईडी व सीबीआयकडे पाठपुरावा करणार असल्याचे […]
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार
सोलापूर जिल्हयात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.लि. पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची महिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोफेशनल ट्रेनींग प्रोग्रॅम अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये फार्मा मॅनेजमेंट डिप्लोमा, जॉब संदर्भातील सल्ले, फार्मा स्किल डेव्हलपमेंट, वेबिनार, चांगल्या फार्मा कंपनीमध्ये प्लेसमेंट असे अनेक प्रोग्रॅम व कोर्स वर्क घेणार असल्यामुळे विद्यार्थ्याचे करिअर उत्तम होणार असल्याचे फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले. विद्यार्थ्यां मध्ये कुशल निर्णय क्षमता व नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी व भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे असे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर डॉ.महेश बुरांडे म्हणाले. यावेळी त्यांचे सहकारी श्री. समीर बुरांडे मुख्यकार्यकारी अधिकारी (आयपीईआर) पुणे, श्री. संदीप भानुशाली मार्केटिंग कन्सल्टन्ट पुणे व श्री. बी आर मासाळ माजी जॉईंट कमिश्नर एफडीए आदी उपस्थित होते. हा सामंजस्य करार संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नवरा वयाने दुप्पट मोठा म्हणून आईने 15 दिवसांच्या बाळाला सोडले फुटपाथवर, पण…
नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीने एका आईने15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या आईचा शोध लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण १५ दिवसांच्या […]
हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड…वाहतुकीचे नवीन नियम पाहिले का?
हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून 2 हजार रुपयांचं असेल. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याचे सुधारित नियम अधिसूचित केले आहेत. मंत्रालयाच्या नियमांनुसार, देशात फक्त दुचाकींसाठी बीआयएस-प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि […]
महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची भरती
राज्याच्या पोलीस दलात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बादमी आहे. राज्य सरकार लवकरच गृहविभागातर्फे पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी वेळी तब्बल 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. राज्यात अनेक तरुण पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. त्या सर्वच तरुणांसाठी हे […]
अखेर ठरलं, राज ठाकरेंची पुण्यातील सभा २२ तारखेला होणार!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, राज ठाकरेंची सभा पुण्यात होणारच असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यात येत्या २२ तारखेला ही सभा होणार अशी माहिती मनसेनं दिली आहे. मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष […]
केतकी चितळेवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, रबाळे पोलिसांनी घेतला ताबा
दोन वर्ष आधीच्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांनी केतकी चितळेचा ताबा घेतला आहे. गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याने दाखल केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सप्टेंबर 2021मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जमीन अर्जही फेटाळला होता. गेल्या 8 महिन्यांपासून केतकीला अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत होते. […]
पुण्यातील कुख्यात टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत पांडुरंग बिरामणे टोळीविरूद्ध पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अस्त्राचा बडगा कायम ठेवत आतापर्यंत 78 टोळ्यांविरुद्ध कारवाई करून गुंडांची कारागृहात रवानगी केली आहे. पांडुरंग बिरामणे (24), संदीप सोमनाथ शेंडकर (23), सलमान उर्फ सल्या हमीद […]
मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने रचला कट, संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा महिलेचा प्रयत्न
प्रियकरा सोबत लग्न करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेने मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा कट रचला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने तिच्या 2 मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने जेवणात विषप्रयोग करून कुटुंबातील इतर चार सदस्यांना ठार मारण्याचा कट रचला होता. ज्योती (21) आणि अर्चना (20) या […]











