गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केतकी चितळेवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, रबाळे पोलिसांनी घेतला ताबा

दोन वर्ष आधीच्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांनी केतकी चितळेचा ताबा घेतला आहे. गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याने दाखल केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सप्टेंबर 2021मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जमीन अर्जही फेटाळला होता. गेल्या 8 महिन्यांपासून केतकीला अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत होते.

मागील काही दिवस केतकी चितळे हिने केलेल्या शरद पवार यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट शेअर प्रकरणी चांगलाच वाद तापला आहे. या प्रकरणात केतकीवर अनेक पोलीस स्टेशनमधे गुन्हा नोंद करण्यात आला असून बुधवारी ठाणे न्यायालयात केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायलायात मागणी केली.

न्यायालयाकडूनदेखील परवानगी देण्यात आली. मात्र, केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांनी न घेता रबाळे पोलिसांनी घेतला. केतकीने २०२० मधे एक पोष्ट केली होती. ज्यामधे जातीवाचक भाषा आणि आक्षेपार्ह लिखाणावर विरोध दर्शवत स्वप्नील जगताप यांनी केतकीवर अॅट्रोसिटी नुसार गुन्हा नोंद केला होता.

याच गुन्हाच्या तपासासाठी रबाळे पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला असून रबाळे पोलीस स्थानकात महिला कोठडी नसल्याने केतकीला वाशी किंवा महापे पोलीस स्थानकात हजर करणार आहेत. शुक्रवारी सकाळी केतकीला वाशी कोर्टात हजर करून पुढील सुनावणी होणार आहे. आता केतकीचा ताबा अजून कोणतं पोलीस स्टेशन घेणार, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *