गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील कुख्यात टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत पांडुरंग बिरामणे टोळीविरूद्ध पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अस्त्राचा बडगा कायम ठेवत आतापर्यंत 78 टोळ्यांविरुद्ध कारवाई करून गुंडांची कारागृहात रवानगी केली आहे.

पांडुरंग बिरामणे (24), संदीप सोमनाथ शेंडकर (23), सलमान उर्फ सल्या हमीद शेख (23), आफान बशिर शेख (23), सौरभ शिवाजी भगत (23), ऋषिकेश उर्फ सनी अनिल शिंदे (21), सुफियान बशिर शेख (19) आणि राजकुमार शामलाल परदेशी (23) या सर्व गुंड तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात राहतात.

बिरामणे टोळीने पुण्यातील सहकारनगर परिसरातील नागरिकांमध्ये दशहत निर्माण केली होती. या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबर दुखापत करणे, अपहरण अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी संबंधित टोळीविरूद्ध कारवाई होण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने अपर आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *