ताज्याघडामोडी

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार

 सोलापूर जिल्हयात  आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी  व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल  एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.लि. पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची महिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली.

    अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे  विद्यार्थ्यांना प्रोफेशनल ट्रेनींग प्रोग्रॅम अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये फार्मा मॅनेजमेंट डिप्लोमा, जॉब संदर्भातील सल्ले, फार्मा स्किल डेव्हलपमेंट, वेबिनार, चांगल्या फार्मा कंपनीमध्ये प्लेसमेंट असे  अनेक प्रोग्रॅम व कोर्स वर्क घेणार असल्यामुळे  विद्यार्थ्याचे  करिअर  उत्तम  होणार असल्याचे फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस  यांनी सांगितले.

   विद्यार्थ्यां मध्ये कुशल निर्णय क्षमता व नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी व भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे असे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल  एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर डॉ.महेश बुरांडे म्हणाले. यावेळी त्यांचे सहकारी श्री. समीर बुरांडे मुख्यकार्यकारी अधिकारी (आयपीईआर) पुणे, श्री. संदीप भानुशाली मार्केटिंग कन्सल्टन्ट पुणे व श्री. बी आर मासाळ माजी जॉईंट कमिश्नर एफडीए आदी उपस्थित होते.

    हा सामंजस्य करार संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस  यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *