अलिकडे शहरात तरुणींचे विश्वास संपादन करुन त्यांच्यावर बलात्काराच्या घटनांचा आलेख झपाट्याने वाढत असून अशीच एक घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडली. जीममध्ये कसरत करण्यासाठी येत असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमीष दाखवून इथल्या जिम ट्रेनरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. युवतीच्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविकांत अशोक धार्मिक (वय […]
ताज्याघडामोडी
पुण्यात मुलबाळासह आर्थिक सुबत्तेसाठी महिलेला स्मशानातील राख पाजली; कौटुंबिक छळ, आघोरी प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल
मुलबाळ होत नसल्यामुळे आणि घरात आर्थिक सुबत्तेसाठी विवाहितेला स्मशानभूमीतील राख पाण्यातून देऊन पिस्तुलाच्या धाकाने हाडांची पावडर खाण्यासाठी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकरणी संबंधित कुटुंबीयांविरूद्ध सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे कृष्णा विष्णू पोकळे (सर्व रा. राधाकृष्ण व्हिला, पोकळे परडाईज, धायरी), दीपक […]
“मला पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते, त्यांना.”; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्यावर येत आहेत. मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांच आम्ही स्वागतच करतो. भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा,सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहे. मात्र आज यांसारखे नेते भाजपाकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. […]
मोठ्या भावाच्या आधी धाकट्याचा विवाह; समाजाच्या भीतीने थोरल्याने लहान भावाचा जीव घेतला
धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाल्याची भावना मनात आली आणि त्यातूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तो विकोपाला गेला त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे घडली. सुधीर चरणदास घरडे (२५, रा. काजना) असे मृताचे नाव […]
तिच्याशी का बोलतो? मैत्रिणीवरुन वाद; कॉलेजसमोरच विद्यार्थ्याला दोघांकडून जबर मारहाण
डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर दोन विद्यार्थ्यांनी मैत्रणीच्या वादातून हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पूर्व भागातील गांधीनगर परिसरातील इमारतीमध्ये हा विद्यार्थी कुटूंबासह राहत असून तो डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर हल्लेखोर दोन्ही विद्यार्थी देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी […]
जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी
गावातील जमीन जुमल्याचे, भावकीतील वादात २२ वर्षीय तरुणीचा बळी गेला. ही घटना राजापूर तालुक्यातील भालवली येथे बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.यातील हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील हल्ला झालेली दुसरी तरुणीला जिल्रुहा ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिध्दि संजय गुरव (वय 22) आणि साक्षी मुकूंद गुरव (वय २१ ) या दोघी भालवली […]
पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला जीव, हृदयपिळवटून टाकणारी घटना
वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं होतं, पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नीला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले आहे. तासाभराच्या अंतरावरच पती पत्नीचे निधन झाल्याची बाब संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हिरामन देवरे यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात […]
‘श्री विठ्ठल’ ने सार्थ ठरविला सभासद,उसउत्पादकांचा विश्वास
कारखान्याच्या काट्याची वैधमापन विभागाच्या पथकाकडून तपासणी,गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल वैद्यमापन विभागाची अचानक भरारी पथक आले असता त्यांनी केलेल्या तपासणीत पथकास कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले, त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकार्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या काही महिन्यात श्री […]
गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.
डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील आता वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. अगदी काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान नृत्य करताना तिच्या हावभावांवरुन तिच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार […]
नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
विश्वास आणि प्रेमावर प्रत्येक नात टिकतं आणि फुलतं. लग्नामध्ये तर प्रेमासोबतच विश्वास खूप गरजेचा आहे. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढल्या आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर जीवनसाथी जास्त जवळचा असतो. त्यानंतर मित्रमंडळी…पण जेव्हा नवरा बायकोमधील एकतरी या नात्याला तडा देतो. त्यावेळी जगावरील विश्वास हरपतो. त्यातच जर नवरा बायकोमध्ये हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच […]