गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, आईने २० दिवसांनी वही उघडली, हादरवणारं कारण समोर

कॉलेजवयीन युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. जर या वयात वाईट संगत लागली, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे पुण्यातील घटनेवरुन समोर आलं आहे. मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने; तसेच मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईने २० दिवसांनी वही उघडली, आणि तरुणीच्या मृत्यूचं गूढ उकललं.

युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येमागचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी युवतीची मैत्रीण आणि एका मित्राच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हरलीन कौर (वय २१ वर्ष, रा. विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. या प्रकरणी हरलीनचा मित्र साईराज आणि मैत्रीण उत्कर्षा ससाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हरलीनच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरलीन हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने १ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.हरलीनला रात्रीच्या जेवणासाठी बोलवायला तिचे वडील गेले. मात्र बराच वेळ झाला तरी ती दरवाजा उघडत नव्हती. अखेर त्यांनी दरवाजा तोडला असता हरलीन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती.

या घटनेनंतर कौर कुटुंबीय धार्मिक विधीसाठी अमृतसरला गेले होते. अमृतसरहून कौर कुटुंबीय पुण्यात परतले. आईने हरलीनची वही, पुस्तक उघडून पाहिले, तेव्हा हरलीनने वहीत आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. मैत्रिणीने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावली. मित्र साईराज दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन मारहाण करायचा. आपला मोबाइल घेतला. मैत्रिणीनेही धमकावले होते, असे हरलीनने चिठ्ठीत म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *