ताज्याघडामोडी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा

पंढरीत ठाकरे समर्थकांची शहर पोलीस ठाण्यात धाव 

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द वापरले व शिवराळ भाषेचा प्रयोग केला असून त्यामुळे अमित शहा यांच्यावर भादंवि १५३(अ),४९९,५००,५०६ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्याकडे निवेदन देत ठाकरे समर्थकांनी केली आहे.   

      अमित शहा यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,त्यांच्या वक्तव्यामुळे भावनेला व श्रद्धेला हानी पोहोचली आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
     हे निवेदन देताना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,तालुका प्रमुख संजय घोडके,शहर प्रमुख रवी मुळे,पंढरपूर शहर समन्वय प्रमुख माउली अष्टेकर,युवा सेना प्रमुख श्रीनिवास उपळकर,शहर उपप्रमुख तानाजी मोरे,दिगंबर सावंतराव,विनय वणारे,अविनाश वाळके,बाबा अभंगराव,विशाल डोंगरे, प्रदिप बडवे, पिंटू गायकवाड,युवा सेना उपजिल्हा प्रमुख अक्षय माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *