ताज्याघडामोडी

पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला

अब्जाधीश गौतम अदानी यांचा एकावेळी भारतीय व्यवसाय क्षेत्रासह शेअर बाजारात देखील दबदबा होता. बाजारात सूचिबद्ध अदानी समूहातील १० कंपन्यांपैकी जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडल्या होत्या आणि गुंतवणूकदारांची चंगळ होती. पण नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याअखेरीस एक अहवाल आला ज्याने अदानी साम्राज्याला हादरवून सोडले. २४ जानेवारी रोजी अमेरिकेची शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाला आणि अदानी ग्रुपच्या शेअर्समधील पडझडीचे सत्र सुरु झाले. पण येत्या काळात ‘अदानी’ शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजीचे सत्र पाहायला मिळू शकते.

अदानी समूहाच्या एका शेअरमध्ये चांगली वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून हा स्टॉक त्यांची सिमेंट कंपनी, अंबुजा सिमेंटचा आहेत. ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलच्या विश्लेषकांनी म्हटले की अंबुजा सिमेंटचे तिमाही निकाल चांगले आहेत आणि आमच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत. ब्रोकरेज हाऊसने नुकत्याच झालेल्या किमतीत सुधारणा केल्यानंतर अंबुजा सिमेंटच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड केले आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर मंगळवारी बीएसईवर ३५२.९० रुपयांवर क्लोज झाला.

ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलने अंबुजा सिमेंटच्या शेअर्सवर ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिले आणि सिमेंट कंपनीच्या शेअर्सवर ४१० रुपयाची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. यापूर्वी फिलिप कॅपिटलने अंबुजा सिमेंटच्या शेअर्सवर तटस्थ रेटिंग दिली होती. अंबुजा सिमेंटच्या शेअरबद्दल बोलायचे तर त्यांची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ५९८.१५ रुपये तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २७४ रुपये आहे. अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप ७० हजार ०७३ कोटी रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *