नाशिक साखर कारखाना २०१३ पासून बंद आहे. या कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. या क्षेत्रातील उभ्या उसाची तोड पूर्ण होईपर्यंत आजुबाजूच्या साखरकारखान्यांचे गाळप बंद करण्यात येवू नये, अशी मागणी ‘नासाका’चे माजी चेअरमन तानाजी गायधनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. संपूर्ण ऊस तोडला नाही तर शेतकऱ्यांवर संपूर्ण क्षेत्र पेटविण्याशिवाय दुसरा […]
ताज्याघडामोडी
मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण
मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संगीता तुपसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांच्यासह पीडितेचा पती भुजंग […]
पंढरपूर मध्ये “नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे” अंतर्गत प्रकल्प सादरीकरण
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ” इन्स्टिट्यूटशन इनोव्हेशन कौन्सिल आणि एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑ. इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने नॅशनल पोलुशन कंट्रोल डे” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. प्रदूषणामुळे जगावर झालेले अन् होणारे दुष्परिणाम यामधुन […]
1 मार्चपासून राज्यातील शाळेच्या वेळेत बदल होणार
1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत आता प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. शाळांसोबत आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. शाळांकडून आलेल्या प्रतिसादानंतरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निर्बंध कमी झाल्यावर हॉटेल, सिनेमागृह खुली […]
ST महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी
ST महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. दरम्यान राज्य सरकारने अहवाल कोर्टाकडे सादर केला असून, उद्या यावर कोर्ट निर्णय देणार आहे. ST कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती करूनही कामावर हजर होत नाही. तसेच राज्यभरात आजही बहुतांश ST कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी […]
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; परिसरात मोठा तणाव
रविवारी कर्नाटकातील शिवमोगा शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती दिसून येत आहे. शिवमोगा येथील तणावपूर्ण स्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कलम 144 लावण्यात आले आह. सोबतच शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या तरुणाची हत्या शिवमोगा येथील भारती कॉलनी स्थित पेट्रोल पंपाजवळ केली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कांदा महागला; दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने सुरु केल्या उपाययोजना
गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ कांद्याचे भाव हळूहळू वाढत आहेत. किरकोळ कांद्याचे भाव वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ज्या राज्यांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत भाव वाढत आहेत, तेथे केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक योजनाबद्ध आणि लक्ष्यित पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लासलगाव […]
डीपीला शॉक लागून एकाचा मृत्यू, महावितरणच्या अभियंत्यासह लाईनमनवर गुन्हा
डीपीचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणचा अभियंता आणि लाईनमनवर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील गेवराई येथे ही घटना घडली आहे. अभियंते शिवरत्न पंडित आणि लाईटमन जयदीप ढगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सावरगाव येथील वस्ती शेजारी असलेला डीपी हा उघड्यावर लाईटच्या खांबाला लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या डीपी मधून तारा बाहेर […]
अखेर ‘राष्ट्रपती’नंतर ‘पंतप्रधान’ला मिळाला जन्मदाखला, धाराशिव जिल्ह्यात एकच चर्चा
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील एका दांपत्याने आपल्या मुलांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली होती. दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा बोरामणी ता.जि. सोलापूर येथे थाटामाटात झाला होता. राष्ट्रपतीचा जन्म दाखला मिळाला, शिवाय आधार कार्ड सुध्दा मिळाले. मात्र पंतप्रधानचा जन्म दाखला लालफितीत अडकला होता. अखेर तीन महिन्यांनी हा तिढा सुटला असून पंतप्रधानलाही जन्मदाखला मिळाला आहे. […]
दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी तयार केले विशेष युनिट
डी-गँगच्या कटाची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट डी-गँगचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने तयार केले आहे. ज्यांचे टार्गेट मोठे नेते आणि सेलिब्रिटी आहेत. एनआयएच्या एफआयआरनुसार दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे […]











