ताज्याघडामोडी

ST महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

ST महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. दरम्यान राज्य सरकारने अहवाल कोर्टाकडे सादर केला असून, उद्या यावर कोर्ट निर्णय देणार आहे.

ST कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती करूनही कामावर हजर होत नाही. तसेच राज्यभरात आजही बहुतांश ST कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बसेच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संप मिटत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहे आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े.

नोव्हेंबर 2021 पर्यंत संपामुळे एसटीचे 439 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून ते 1 हजार 600 कोटी 25 लाखांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या कोर्टाच्या सुनावनीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *