एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ” इन्स्टिट्यूटशन इनोव्हेशन कौन्सिल आणि एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑ. इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने नॅशनल पोलुशन कंट्रोल डे” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
प्रदूषणामुळे जगावर झालेले अन् होणारे दुष्परिणाम यामधुन प्रदूषण कसे नियंत्रणात ठेवावे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी *इन्स्टिट्यूटशन इनोव्हेशन कौन्सिल* एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने “पोल्युशन कंट्रोल डे” आयोजित करण्यात आला होता. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये ५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी “एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन अँड सोल्ड वेस्ट मॅनेजमेंट अशा तीन प्रकारच्या थीम होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन ऑनलाईन व ऑफलाईन मोडमध्ये सादरीकरण केले. यामध्ये योग्य मूल्यमापन नंतर प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वितरण मान्यवरांकडून देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम व त्यावर नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी परिवेक्षक म्हणून डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुजित राठोड, प्रा. यशवंत पवार, प्रा. शेखर पाटील आदींनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रकाश गडेकर यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विद्यार्थ्यांचे समुह व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.