ताज्याघडामोडी

येत्या १ डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधी नियम बदलतोय, उल्लंघन केल्यास तुरुंगवास!

बनावट सिम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी दूरसंचार विभागनं सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडासह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे नियम १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केले जाणार होते. परंतु, सरकारने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानुसार येत्या १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होतील. दूरसंचार […]

ताज्याघडामोडी

पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अडथळा ठरली, कट रचून संपवलं, नंतर पोलिसात धाव घेत म्हणाला…

श्रीगोंदा शहरातून पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करून स्वतःच्या अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पारगाव येथील ज्ञानदेव आमटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराजवळ खड्डा करून प्रेत पुरून पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील ज्ञानदेव पोपट आमटे याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत मॅच हरला; तरुणाचा वडिलांवर हल्ला, मारहाणीत भावाचा मृत्यू

मटण खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली. अंकित इंगोले (वय २८ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान […]

ताज्याघडामोडी

घरच्यांच्या विरोधात जात प्रेमविवाह; पण छठपूजेसाठी पैसे मागितल्याने पत्नीची निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पत्नीने छठपूजेसाठी पैसे मागितल्याने पती इतका नाराज झाला की त्याने पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये भरून गावातून पळ काढला. सध्या ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी 36 तासांनंतर आरोपी पतीला अटक केली आहे. त्याच्या माहितीवरून कुशीनगर जिल्ह्यातून एका महिलेचा मृतदेहही सापडला आहे. सुरौली पोलिसांनी आरोपीविरुद्ध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेअर बाजारात २२ लाख बुडाले, कर्जबाजारी पोलिसाच्या घरफोड्या, एका गोष्टीने जाळ्यात सापडला

ज्या पोलिसांवर सर्वसामान्य माणूस रक्षणाची भिस्त ठेवतो, त्याच पोलिसाने चक्क घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली. शेअर बाजाराता सातत्याने नुकसान होऊन आरोपीवर २२ लाखांचं कर्ज झालं होतं. त्यासाठीच त्याने घरफोडी केल्या आरोप आहे. स्थानिक गुन्हे शाखेत नरेश डाहुले नावाचा पोलीस कार्यरत आहे. त्याने ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चंद्रपूर शहरातील उपगनलावार ले-आऊट […]

ताज्याघडामोडी

लग्नाला दिला नकार, तरुणाने मुलीच्या कुटुंबावरच केला गोळीबार

छठपूजा करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर बेछूट गोळीबार करण्यात आला. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली. छठ घाटावरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. धक्कादायक घटना पंजाबी मोहल्लामध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराची माहिती […]

ताज्याघडामोडी

कार्तिकी यात्रा 2023 साठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज.

प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात,भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी उपाययोजना  अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.23/11/2023 रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी मा.जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.   पंढरपूर शहरामध्ये […]

ताज्याघडामोडी

आ समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर २१ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावोगावी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचे अवैध संबंध, घरात पडलेली चिठ्ठी अन् 4 सडलेले मृतदेह; अख्खं कुटुंब क्षणात संपलं, हादरवणारी घटना

एक अतिशय हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आले आहेत. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 52 वर्षीय कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर, त्यांची पत्नी देबश्री कर्माकर वय 40), त्यांची 17 वर्षांची मुलगी देबलीना आणि 8 […]

ताज्याघडामोडी

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं वडिलांनी रागवल्यानं 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं यापूर्वीही गेम खेळण्यापासून रोखल्यास स्वत:चं नुकसान करण्याची धमकी घरच्यांना दिली होती. या मुलाला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन होतं. गुरुवारी […]