ताज्याघडामोडी

येत्या १ डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधी नियम बदलतोय, उल्लंघन केल्यास तुरुंगवास!

बनावट सिम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी दूरसंचार विभागनं सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडासह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे नियम १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केले जाणार होते. परंतु, सरकारने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानुसार येत्या १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होतील.

दूरसंचार विभागने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, सिमकार्ड विक्री करणाऱ्या व्यक्तीला सिमकार्ड खेरदी करणाऱ्या व्यक्तीची केव्हायसी करणे बंधनकारक आहे. कोणताही व्यक्ती एकावेळी दोन सिमकार्ड खरेदी करू शकत नाही. एवढेच नव्हेतर, एका आयडीवर म्हणजेच एका कागदपत्रावर मर्यादीत सिमकार्ड खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, सर्व सिकार्ड विक्रेत्यांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीकडून १० लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. याचबरोबर तरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.

महत्त्वाचे म्हणजे, काही सिमकार्ड विक्रेते अयोग्य पद्धतीने व्हेरिफिकेशन करत आहेत. ज्यामुळे फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. तसेच कोणताही व्यक्ती बनावट सिमकार्ड विकताना किंवा खरेदी करताना आढळल्यास त्याला ३ वर्षे तुरुंगात जावे लागणार आहे. याशिवाय, त्याचे लायसन्स ब्लॅकलिस्ट केले जाईल, असाही सरकारने इशारा दिला आहे. भारतात सध्या १० लाख सिम विक्रेते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *