गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेअर बाजारात २२ लाख बुडाले, कर्जबाजारी पोलिसाच्या घरफोड्या, एका गोष्टीने जाळ्यात सापडला

ज्या पोलिसांवर सर्वसामान्य माणूस रक्षणाची भिस्त ठेवतो, त्याच पोलिसाने चक्क घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली. शेअर बाजाराता सातत्याने नुकसान होऊन आरोपीवर २२ लाखांचं कर्ज झालं होतं. त्यासाठीच त्याने घरफोडी केल्या आरोप आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत नरेश डाहुले नावाचा पोलीस कार्यरत आहे. त्याने ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चंद्रपूर शहरातील उपगनलावार ले-आऊट येथे मुस्तफा शेख यांचे घर आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घराला कुलूप होते. नेमक्या याच संधीचा फायदा नरेशने उचलला.

शेख कुटुंब परत आल्यावर त्यांनी या प्रकाराची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार तपास सुरू झाला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. येथील सीसीटीव्ही कॅमेरात नरेश कैद झाला आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागात काम करणारा जबाबदार पोलीस या कृत्यात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात त्याने दोन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *