ताज्याघडामोडी

सरकारने वाहनांसाठी जारी केला नवा नियम, या दोन गोष्टींशिवाय चालवता येणार नाही गाडी

तुम्ही कोणतंही वाहन चालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वाहनांशी संबंधित एक नवं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. गाड्यांच्या पुढील आरशांवर आता लवकरच फिटनेस सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन मार्क लावणं अनिवार्य होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यात नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड!

वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली सुरू केली खरी, मात्र अनेकदा ही दंड आकारणी काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाइन चालान आले. त्याने अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा […]

ताज्याघडामोडी

पेट्रोल, डिझेल दरात लवकरच 25 ते 30 रुपयांपर्यंत होणार वाढ!

रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्‍ती वाढतच चालल्याच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूडचे प्रतिबॅरलचे दर आता 117 डॉलर्सवर गेले असून, परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल दर लिटरमागे 25 ते 30 रुपयांनी वाढविले जातील, अशी शक्यता आहे. इंधन दरवाढीचा फटका बसू नये, यासाठी अनेक देशांनी त्यांच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’चा […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत

  ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांशिवाय ओबीसी आरक्षणासह निवडणुका होऊ शकणार नाहीत. याच संदर्भात आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन […]

ताज्याघडामोडी

वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला दणका; लाच घेताना रंगेहात पडकलं!

पोलिसांनी कारवाईबाबत दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागात ट्रान्सफॉर्मर लोड-अनलोडिंग रिप्लेसमेंटचे काम करतात. तक्रारदाराने वीज मंडळाची कामे पूर्ण करुन बिले मंजुरीसाठी पाठवली. ही बिले मंजूर करण्याचं काम सहाय्यक अभियंता काशिदकर यांच्याकडे होते. तक्रारदारांच्या पूर्वीच्या पूर्ण झालेल्या कामाच्या बिलाबाबत त्यांनी काशिदकर यांची २३ फेब्रुवारी रोजी भेट घेतली असता बिले मंजूर करण्यासाठी त्यांनी १ लाख […]

ताज्याघडामोडी

अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्स जारी, राज्य लॉकडाऊनमुक्तच्या दिशेला

कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरु व्हावेत या उद्देशाने सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोरोना परिस्थितीनुसार आखलेल्या वर्गांमध्ये या 14 जिल्ह्यांचा A गटात समावेश […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी मध्ये काँक्रीट तंत्रज्ञानावर गुणवत्ता सुधार कार्यक्रम कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीअरिंग विभागामार्फत काँक्रीट तंत्रज्ञानावर गुणवत्ता सुधार कार्यक्रम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. या कार्यशाळेसाठी सोलापूर येथील जे के सुपर सीमेंट या कंपनी मधील सीनियर टेक्निकल ऑफिसर श्री पंकज साखरकर, श्री. अजित पाटील, सीनियर […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांच्या नावे पुण्यात पुन्हा एकदा फसवणूक; पीएसोबत ओळख असल्याचं सांगत १० लाखाला गंडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशी एक घटना घडली आहे. माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देण्यात येणाऱ्या 27 टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी निवाडा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. राज्य सरकारने सदर प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या आरक्षणाचे प्रकरण […]

ताज्याघडामोडी

थकीत वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, घेतला महत्वाचा निर्णय

राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन […]