कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरु व्हावेत या उद्देशाने सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोरोना परिस्थितीनुसार आखलेल्या वर्गांमध्ये या 14 जिल्ह्यांचा A गटात समावेश होतो.
या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर इतर जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. राज्य सरकारच्या या नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल पूर्णपुणे लॉकडाऊनमुक्तीकडे असल्याचं दृश्य आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटले?
मुंबई शहर
मुंबई उपनगर
पुणे
नागपूर
रायगड
वर्धा
रत्नागिरी
सातारा
सांगली
गोंदिया
चंद्रपूर
कोल्हापूर
A वर्गाचे निकष
– 1 डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्के असावी.
– 2 डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्के असावी.
– संबंधित जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून कमी असावा.
– संबंधित जिल्ह्यातील भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या 40 टक्क्यांहून कमी असावी.
A वर्गातील जिल्हे – 14
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा।, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर
– सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी
इतर जिल्ह्यांचं काय?
– अंत्यसंस्कार, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ, 50 टक्के उपस्थिती परवानगी देण्यात आली आहे.
– शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह रेस्टारंट, बार, जिम स्पा, स्विमिंग पूल धार्मिक स्थळ, नाट्यगृह पर्यटन स्थळ मनोरंजन पार्क 50 टक्के क्षमतेची परवानगी असणार आहे.