ताज्याघडामोडी

कर्मयोगी मध्ये काँक्रीट तंत्रज्ञानावर गुणवत्ता सुधार कार्यक्रम कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीअरिंग विभागामार्फत काँक्रीट तंत्रज्ञानावर गुणवत्ता सुधार कार्यक्रम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी सोलापूर येथील जे के सुपर सीमेंट या कंपनी मधील सीनियर टेक्निकल ऑफिसर श्री पंकज साखरकर, श्री. अजित पाटील, सीनियर मार्केटिंग ऑफिसर श्री. विवेक हजारे यांनी काँक्रीट तंत्रज्ञानावर गुणवत्ता सुधार कार्यक्रम या विषयावर सखोल व्याख्यान देऊन प्रात्यक्षिके ही सादर केली. या कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाचा व प्रात्यक्षिकांचा फायदा नक्कीच महत्वपूर्ण आहे असे मत उपस्थित असलेल्या प्राध्यापक, कंत्राटदार व निरीक्षक यांनी व्यक्त केले.

कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जातात आणि यामधील काही कार्यशाळेचा फायदा केवळ विद्यार्थी व प्राध्यापकांपूरता च मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना ही या उपक्रमाचा फायदा होत असल्यामुळे समाजातून सर्व घटकातून समाधान व्यक्त होत आहे.

सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. ए टी बाबर यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश सांगीतला. प्रा. एस एम पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. पी बी झांबरे यांनी कार्यशाळेची माहिती उपस्थितांना दिली. प्रा. अमरजीत देवकर यांनी या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

सदर च्या कार्यशाळेस श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी शुभेछ्या दिल्या. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक, कंत्राटदार व निरीक्षक उपस्थित होते. प्रा. अतुल सुतार यांनी आभार मानून कार्यशाळेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *