ताज्याघडामोडी

भोंगे काढायले सांगितले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली’

मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असं सगळीकडे सांगत सुटतात”, अशा जहरी शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही अशी व्याख्या आहे, की ज्या हिंदुत्वाने जीवनाचा मार्ग दाखवला. तुमच्या सरकारमधले मंत्री भ्रष्टाचार करुन […]

ताज्याघडामोडी

रूपाली चाकणकरांविरोधात हायकोर्टात याचिका; गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या पदाचा दुरूपयोग करून त्या राजकीय लढाई करीत असल्याचा आरोप असून ही याचिका इंडियन बार असोसिएशनने दाखल केली आहे. या याचिकेत भाजपा नेते नारायण राणे आणि गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ऊस वाहतूक गाडी मालकाने 13 ऊसतोड मजुरांसह 9 लहान मुलांना ठेवलं डांबून

कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने,13 महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या 9 लहान मुलांना डांबून ठेवलं आहे. असा आरोप पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. यामुळं वृद्ध आजीसह इतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या वारोळा गावातील व गेवराईच्या भेंड खुर्द गावातील ऊसतोड मजूरांनी, ट्रॅक्टर मालक दत्ता दगडू गव्हाणे यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशाची उचल […]

ताज्याघडामोडी

सिंहगड मध्ये थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळा संपन्न

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय, थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व इन्स्टीट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडिया (आय ई आय) सोलापूर सेंटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. नावीन्यपूर्ण प्रकल्प तसेच संशोधनात्मक वृत्त्ती विकसित होण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीवरील संशय, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राचा खून

प्रेयसीवरील संशयावरुन एका तरुणाने तिच्या वरिष्ठाला जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्लामुळे तरुणीने आपल्या मामांना बोलावले. त्यांनी प्रियकराला मारहाण सुरू केली. ते पाहून त्याचा मित्र भांडणे सोडविण्यास गेला, तेव्हा त्यालाही मारहाण झाली आणि त्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली. गणेश गायकवाड (वय २१, रा. […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत ‘ग्रॅज्युएशन डे’ उस्ताहात साजरा

शनिवार, दि.३०.०४.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत सिनिअर के.जी.(मोठा गट) च्या विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” उत्साहात साजरा झाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संपल्यानंतर सिनिअर के.जी.चे विद्यार्थी पहिलीच्या वर्गात जाताना त्यामध्ये ख-या अर्थाने शिक्षणाला सुरुवात करतात व त्या लहानपणीच्या आठवणी आयुष्यभर पुरवणा-या असतात अशा अर्थपुर्ण शिक्षणासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन ही प्रशाला विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण शिक्षण देण्यास नेहमीच अग्रेसर असते. या कार्यक्रमास कर्मयोगी फाऊंडेशनच्या उपप्राचार्या सौ.मानसी दास यांनी प्रमुख हजेरी लावत लहानग्यांना खुपच मोलाचे मार्गदर्शन केले.प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग सांगत आजच्या विद्यार्थ्यांचे ख-या अर्थाने फाऊंडेशन हे प्रि-प्रायमरीलाच होते असते व यातुनच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचाल गती प्राप्त होते असे मोलाचे विचार त्यांनी मांडले. संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी छोट्या पदवीधरांना मनःपुर्वक शुभेच्छा देत भरपूर कौतुक केले.या कार्यक्रमाला प्रशालेचे रजिस्ट्रार गणेश वाळके उपस्थित होते व यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पाडला.

ताज्याघडामोडी

राज्यात 7 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार; गृहमंत्र्यांची माहिती

नागपूर पोलीस दलाकरीता सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा भव्य पोलीस भवनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ, व्यवस्थापकीय संचालक विवेक फळसणकर उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधीपक्ष नेते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्यांचं धक्कादायक कृत्य, पतीच्या दारातच…

विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी थेट सासरच्या दारामध्ये चिता रचून अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या आरग नजीकच्या लक्ष्मीवाडी या ठिकाणी असणाऱ्या एका विवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक, कर्नाटक CID ची कारवाई

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीनं पुण्यातून ही अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पुण्यात लपून बसली होती आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी आरोपी आहे. दिव्याचा पती राजेश हगारगी याला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भर लग्नात वधूची डोक्यात गोळी झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका घरात लग्नाचे सर्व कार्यक्रम जल्लोषात संपन्न होत होते. रात्री जेवण झाल्यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळीच नववधूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. घरात वधूच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर विवाह समारंभासाठी आलेल्या नातेवाईकांनी खोलीत धाव घेतली. यावेळी नातेवाईकांना वधू काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. ही घटना झाल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून […]