ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत ‘ग्रॅज्युएशन डे’ उस्ताहात साजरा

शनिवार, दि.३०.०४.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत सिनिअर के.जी.(मोठा गट) च्या विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” उत्साहात साजरा झाला.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संपल्यानंतर सिनिअर के.जी.चे विद्यार्थी पहिलीच्या वर्गात जाताना त्यामध्ये ख-या अर्थाने शिक्षणाला सुरुवात करतात व त्या लहानपणीच्या आठवणी आयुष्यभर पुरवणा-या असतात अशा अर्थपुर्ण शिक्षणासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन ही प्रशाला विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण शिक्षण देण्यास नेहमीच अग्रेसर असते.

या कार्यक्रमास कर्मयोगी फाऊंडेशनच्या उपप्राचार्या सौ.मानसी दास यांनी प्रमुख हजेरी लावत लहानग्यांना खुपच मोलाचे मार्गदर्शन केले.प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग सांगत आजच्या विद्यार्थ्यांचे ख-या अर्थाने फाऊंडेशन हे प्रि-प्रायमरीलाच होते असते व यातुनच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचाल गती प्राप्त होते असे मोलाचे विचार त्यांनी मांडले.

संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी छोट्या पदवीधरांना मनःपुर्वक शुभेच्छा देत भरपूर कौतुक केले.या कार्यक्रमाला प्रशालेचे रजिस्ट्रार गणेश वाळके उपस्थित होते व यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *