गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक, कर्नाटक CID ची कारवाई

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीनं पुण्यातून ही अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पुण्यात लपून बसली होती आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी आरोपी आहे. दिव्याचा पती राजेश हगारगी याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे तर त्यावेळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती. गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना गुरुवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कोण आहे दिव्या हागारगी

दिव्या कलबुर्गी येथील ज्ञान ज्योती संस्था ही शैक्षणिक संस्था चालवतात आणि कलबुर्गी येथील भाजपच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर पक्षानं तिची हकालपट्टी करुन पक्षाचा याच्याशी काहीह संबंध नसल्याचं सांगितलं. दरम्यान स्थानिक लोक आणि पोलीस अधिकारी पुष्टी करतात की, ती भाजपमध्ये सक्रिय होती आणि पदांवर होती. फेब्रुवारीमध्ये कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिव्याची भेट घेतली होती. भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हे झालं होतं.

वीरेश नावाच्या उमेदवारानं केवळ 21 प्रश्न सोडवल्यानंतरही भरती परीक्षेत 121 गुण मिळविल्यानंतर सीआयडीच्या चौकशीत दिव्याचं नाव पुढे आले. त्या उमेदवाराचं परीक्षा केंद्र ज्ञान ज्योती संस्था होती. वीरेशने 7 वी रँक मिळवली होती, पण चौकशीत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या संस्थेत अनेक उमेदवारांनी गैरव्यवहार केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीएसआय पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा करार झाला होता. तसंच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती सीआयडीच्या तपासातून समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *