ताज्याघडामोडी

भोंगे काढायले सांगितले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली’

मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असं सगळीकडे सांगत सुटतात”, अशा जहरी शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही अशी व्याख्या आहे, की ज्या हिंदुत्वाने जीवनाचा मार्ग दाखवला. तुमच्या सरकारमधले मंत्री भ्रष्टाचार करुन जेलमध्ये गेलेत, म्हणूनच महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलीय, असं म्हणत फडणवीसांनी आघाडी सरकारला लक्ष्य केलं.

मुंबईतील सोमय्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुस्टर डोस सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. काही जणांना वाटतं की आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे हिंदुत्व, पण मला त्यांना सांगायचंय की तुम्ही म्हणेज महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असंही फडणवीसांनी निक्षून सांगितलं.

‘हा देवेंद्र फडणवीस बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याठिकाणी होता’

“अयोध्येत मशीद होती, हे मी मानत नाही. तो ढाचा होता. हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानाने सांगतो, आम्ही केलंय. तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली त्यावेळी तुम्ही कुठे होता…? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याठिकाणी होता. एवढंच नाही तर राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये घालवले. लाठ्या-काठ्या खाण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं”.

बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेना नेता तिथे नव्हता

“बाबरी पडली त्यावेळी महाराष्ट्रातून एकही नेता तिथे गेला नव्हता. एकही शिवसैनिक तिथे हजर नव्हता. बाबरी मशीद पडली त्यावेळी कुणावर आरोप झाला?, त्यावेळी ३२ आरोपी होते, त्यात भाजप नेते लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंगजी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती…. आणि त्यातला एक आरोपी मंचावर आहे, ते म्हणजे जयभान सिंग पवय्या…या ३२ आरोपींमध्ये एकही शिवसेना नेता नाही. आमचा दोष एवढाच आहे, आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही, अनुशासन तोडता येत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *