ताज्याघडामोडी

सांगलीत कोरोनाची स्थिती भीषण, रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळेना, रुग्णाला टेम्पोत टाकून वणवण फिरण्याची नामुष्की

सांगली : राज्यात अजून ऑक्सीजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड प्रयत्न करावे लागत आहेत. सांगली जिल्ह्यात अशाच प्रकारची एक घटना आज बघायला मिळाली. एका कोरोनाबाधित महिलेसाठी सांगलीत ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. या महिलेला बेड मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांनी प्रचंड खटाटोप केला. सांगतील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळावा […]

ताज्याघडामोडी

पोटनिवडणुकीत कौल कुणाला ?

   समाधान आवताडे यांची निर्णायक आघाडी घेत विजयाकडे वाटचाल   पंढरपूर शहर आणि २२ गावांची मतमोजणी संपली आवताडेंना ६१६ मतांची आघाडी  पंढरपूर शहर आणि २२ गावात आवताडेंना अपेक्षित आघाडी नाही,आता मदार मंगळवेढा शहर व तालुक्यावर एकूण ३८ फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली    पोटनिवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी (वेळ साय: ७ वा  )         […]

ताज्याघडामोडी

रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने डाॅक्टरसहित 8 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. उपचारांसाठी लागणारी संसाधने कमी पडत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा देशात तुटवडा आहे. अशातच दिल्लीतील बत्रा रुग्णालयातील आठ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाने हायकोर्टात यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत […]

ताज्याघडामोडी

सर्व ओझं माझ्या खांद्यांवर आलं, मी एकटा काय करणार?

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाचा प्रचंड दबाव असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत रौद्र रुप घेऊन आली, त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना प्रचंड तणावात असल्याचं त्यांनी म्हटलं. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं देशात कोविशिल्ड या लशीची निर्मिती केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर लशीची मागणी […]

ताज्याघडामोडी

तुम्ही झोपा काढताय की चपात्या भाजताय?

पुणे, 1 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा राजकारण काही थांबताना दिसत नाहीये. सत्ताधारी केंद्र सरकार वर दुजाभावाचा आरोप करत आहेत तर भाजप नेतेही राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तुम्ही काय चपात्या भाजत होते का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरकारमान्य धान्य रेशनिंग दुकानात अवैध “दारूविक्री”

सातारा | कोरेगांव तालुक्यातील चिमगणगाव येथे एका सरकारमान्य रास्त भाव धान्य रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमणगांव येथील एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची […]

ताज्याघडामोडी

मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका

नवी दिल्ली, 01 मे: सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा उच्चांक गाठेल. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. बँकांची एक संस्था असणाऱ्या एसएलबीएसने […]

ताज्याघडामोडी

काल एका दिवसात देशात ४ लाख नवे रुग्ण 

कोरोनामुळे  देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्येत आणखी किती वाढ होणार, याबद्दल काहीही अंदाज नाही. अशात आता शुक्रवारची रुग्णसंख्या  समोर आली असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 1 कोटी […]

ताज्याघडामोडी

कोरोनाचा कायमचा बंदोबस्त करणारी ‘सुपर लस’ तयार

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधातील नवीन लसीचा शोध लावला असल्याचा दावा करणारी बातमी एका वेबसाइटवर देण्यात आली आहे. संबंधित नवी लस कोरोनाचे सर्व प्रकार आणि अवतार आणि भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य अवतारांवरही परिणामकारक ठरणार असल्याचे, थोडक्‍यात कोरोनाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारी ठरणार असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ही नवीन लस ‘सुपर लस’ म्हणून ओळखली जाणार आहे. […]

ताज्याघडामोडी

आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत.आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊन का लावू नये, असं कोर्टाने विचारलं आहे, पण आहे त्यापेक्षा करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री म्हणाले, “जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची […]