राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत २४ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी शिक्षक भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केलाशिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकभरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला […]
ताज्याघडामोडी
फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन.डी.एल.आय. क्लब या विषयी ऑनलाईन वेबिनार संपन्न
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च ग्रंथालय विभाग यांच्या वतीने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन.डी.एल.आय. क्लब या विषयी वापरकर्ता जागरूकता ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. नॅशनल डिजीटल लायब्ररी ऑफ इंडिया हे शिकण्याच्या संसाधनांचे एक आभासी भांडार आहे जे केवळ शोध/ब्राउझ सुविधा असलेले भांडारच नाही तर पाठ्यपुस्तके, लेख, व्हिडिओ, ऑडिओ बुक्स, व्याख्याने, सिम्युलेशन, फिक्शन आणि इतर सर्व प्रकारच्या शिक्षण माध्यमांचा समावेश असलेल्या सेवा उपलब्ध […]
जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; तरुणाने थेट आणली तलवार अन्…
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी पहायला मिळाली. या मारामारीत यामध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर तलवारीने वार केले. अंगावर शहारे आणणारा हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी […]
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाअध्यक्षपदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची निवड
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिक साळुंखे हे गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत आहेत. मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात नेहमीच अग्रणी असतात. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहूनच अशा अभ्यासू युवा नेतृत्वाची निवड करण्यात आली असे मराठा […]
सगळं ठीक आहे ना? २१ वर्षीय नर्सचा कुटुंबासोबत व्हिडिओ कॉल, ऑन ड्युटीच आयुष्य संपवलं
रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय पारिचारिकेने ऑन ड्यूटी असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण […]
‘न्यु सातारा’ चा विद्यार्थी अथर्व देवकर याची महिंद्रा प्रा. लि.पुणे या कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्याची Mahindra Pvt.Ltd.Pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. Mahindra Pvt.Ltd.Pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्याची […]
आधी पत्नी-पुतण्याला संपवलं, मग स्वत:वर गोळी झाडली
अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं. पुण्यात सुटीवर आलेल्या गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याला संपवून नंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारत गायकवाड हे अमरावती […]
भाळवणी ग्रामीण रुग्णालयाला मान्यता; दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश
भाळवणी (ता. पंढरपूर) येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता परिसरातील गावांमधून नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. त्या अनुषंगाने तात्कालीन जिल्हा परिषद सदस्या शोभाताई वाघमोडे देशमुख व पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांचे मार्फत प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाळवणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. अखेर शासनाने […]
मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं
शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे […]
“…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. यातील काही बॅनर्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी […]