व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. […]
ताज्याघडामोडी
‘शिंदे गटातील आमदार हे भाजपमध्ये…’, संजय राऊतांचा मोठा दावा
‘सध्याचं सरकार हे बेकायदेशीर आहे. हे सरकार टिकणार नाही. अधिवेशनातलं मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं. त्यांनी आपण कुठे बोलतोय याचं भान ठेवायला हवं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. तसंच शिंदे गटातील आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील, असा दावाही राऊतांनी केला. संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना […]
आंधळं प्रेम! सासूने जावयासोबत ठोकली
एक ४० वर्षांची सासू आणि तिच्या २७ वर्षांच्या जावयाने धूम ठोकाली. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. दोघांनी पळून जाण्याआधी जावयाने आपल्या सासऱ्यासोबत दारू पार्टी केली होती. सासऱ्याला शुद्ध आल्यानंतर पत्नी पळून गेल्याचे समजल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरुन फरार प्रेमी जोडप्याचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण सिरोही जिल्ह्यातील अनादरा ठाण्याच्या परिसरातील आहे. सिरोही […]
भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोरच जाळला पुतळा
नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक’ असा उल्लेख केल्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला. यावेळी ‘अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. ‘अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या वतीने भिगवन चौकात […]
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापाने दोन दिवसांच्या बाळासोबत केलं धक्कादायक कृत्य
अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधमाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला क्रुर शिक्षा दिली.अमरावतीच्या सावर्डी इथे ही संतापजनक घटना घडली असून या प्रकरणी निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्या निष्पाप बाळावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावती जिल्ह्यातील सावर्डीचा गिरीश गोंडाणे हा […]
अब्दुल सत्तारांना डब्बल धक्का, थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल
हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजला. वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआयकडे तक्रार दाखल झाली आहे. सीबीआयपाठोपाठ ईडीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली […]
“उद्धव ठाकरे यांनी ‘ही’ एक गोष्ट करावी, शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील मंत्र्याचा दावा
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली.बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले गेले किंवा या दोघांनी एकत्र येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली.पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही शक्यता मावळली. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्र्यानेच […]
नवीन वर्षात मिळाली गॅस दरवाढीची भेट; जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ
दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यातच आता नवीन वर्षात गॅस दरवाढीची भेट सर्वसामान्यांना मिळाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग […]
अनैसर्गिक शारीरिक संबंध करत महिलेवर अत्याचार, डॉक्टरवर गुन्हा दाखल
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील डॉक्टराने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार केला. तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली. उच्चशिक्षित डॉक्टरकडून या प्रकारे महिलेस वागणूक मिळाल्याची घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर व त्यांच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मापुरी येथे बी. […]
‘थर्टी फर्स्ट’चा वाद तरुणाच्या जीवावर बेतला
गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच एकीकडे सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना धरणगाव शहर तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. कालू सोनवणे (वय ३० रा, दहिवद तांडा, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. धरणगाव शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. […]











