गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाचा तुरुंगवास, पावणे दोन कोटीचा दंड

महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचा नेता अडचणीत सापडला आहे. कोर्टाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवली आहे. पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने हा निर्णय दिला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ब्रेकअपनंतर प्रियकराला प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने जिवंत जाळले; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रकार १२ फेब्रुवारी रोजी घडला होता. तर १३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेम प्रकरणामधून झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणाचा उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. […]

ताज्याघडामोडी

रेल्वेसमोर उडी घेऊन 2 चिमुकल्यांसह बापाची आत्महत्या, नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील घटना

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील 27 वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या 2 चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नगरदेवळा रेल्वेस्थानकावर घडली. जितेंद्र दिलीप जाधव (रा. बोरखेडा ता. चाळीसगाव), चिराग जाधव (6) आणि खुशी जाधव (4) अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीस गाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र हा पत्नी पूजा आणि दोन […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार? संभाजीराजे मोठ्या घोषणेच्या तयारीत

खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सभाजीराजे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते. राज्यभरातील अनेकांना भेटून त्यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे त्याआधी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर राज्यभरात फिरुन त्यांनी समाजातील विविध घटकांशी चर्चा केली. या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. […]

ताज्याघडामोडी

कॉंग्रेसचा राष्ट्रवादीला धक्‍का ! नगराध्यक्षासह 20 नगरसेवकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. मागील महिन्यात कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्यानंतर मालेगावमध्ये कॉंग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याची आज कॉंग्रेसने राष्ट्रवादीला परतफेड केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडून महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! प्रियकराच्या साथीने पत्नीनेच केली भाजप नेत्याची हत्या

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रचारसभांच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना राज्यात भाजप नेत्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या हेतूने भाजप नेत्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. नोएडा पोलीस उपायुक्त (झोन III) अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील […]

ताज्याघडामोडी

हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधले औषध

संशोधकांनी अशा औषधाचा शोध लावला आहे जे हार्ट अटॅक आणि हार्ट फेलच्या धोक्यापासून बचाव करते. हे औषध हार्ट फेल होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांची गरज देखील संपवते. सर्वसाधारणपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषध घेत असतो, मात्र त्याचा काहीही परिणाम होत नाही. अशा परिस्थित वैज्ञानिकांनी शोधलेले हे औषध फायदेशीर ठरणार आहे. हे औषध […]

ताज्याघडामोडी

खा.शरद पवारांना राजू शेट्टी यांनी लिहले खरमरीत पत्र

प्रति, मा. खा.शरद पवारसो , अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तथा संस्थापक महाविकास आघाडी . महोदय , ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप सरकारच्या पराभवासाठी पायाला भिंगरी लावून तुम्ही महाराष्ट्र पालथा घातला. प्रकृती बरी नसतानाही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात शेतकर्यांच्या बांधापर्यंत जाऊन भाजप सरकारच्या पराभवासाठी आवाहन करत होता. त्याचवेळी दिर्घकाळ तुमच्याबरोबर राहीलेले व तुमच्या आडून सत्तेचे चव […]

ताज्याघडामोडी

सिंहगड मध्ये नॅशनल एनेर्जी कन्सर्वेशन डे साजरा

पंढरपूर: प्रतिनिधी  उर्जेची बचत कसे करावी, अपारंपारिक ऊर्जा स्वतःच्या माध्यमातून कसे ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते आणि तिचा वापर मर्यादित केला जाऊ शकतो या विषयी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल एस.के.एन सिंहगड कॉलेजच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला.  या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये ५१ स्पर्धकांनी भाग नोंदवला […]

ताज्याघडामोडी

कीर्तनाच्या बनावट सीडी बनविणाऱयांची चौकशी करा, इंदुरीकर यांची मागणी

कीर्तनाच्या बनावट सीडी प्रसारित करणाऱयांची चौकशी करावी, अशी मागणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. काहीजण माझ्या संमतीखेरीज कीर्तनाचे व्हिडीओ काढून ‘मराठी बाणा’ या वाहिनीकडून अनधिकृतपणे प्रसिद्ध केले जात आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. कीर्तनामध्ये काही छेडछाड करून चुकीच्या गोष्टी प्रसिद्ध […]