पंढरपूर: प्रतिनिधी
उर्जेची बचत कसे करावी, अपारंपारिक ऊर्जा स्वतःच्या माध्यमातून कसे ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते आणि तिचा वापर मर्यादित केला जाऊ शकतो या विषयी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल एस.के.एन सिंहगड कॉलेजच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये ५१ स्पर्धकांनी भाग नोंदवला आणि आपले ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जी तसेच रिन्यूएबल एनर्जी या विषयावर ती निबंध प्रस्तूत केले.
या दरम्यान आलेल्या निबंधांचे योग्यरीत्या मूल्यांकन करून विनर ऑफ रनर ऑफ आणि कौंसोलिडेटेट असे तीन प्राईजेस देण्यात आले. विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव बरोबर आणखी काही जुनियर कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे ऊर्जा बचत करू शकतो या संदर्भामध्ये केलेल्या लेखनावर आपले मत मांडले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल च्या माध्यमातून असे विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात आणि त्यापैकी एक असणारा हा नॅशनल एनर्जी कंजर्वेशन डे का साजरा केला जातो.
याची योग्यती माहिती दिली. महाविद्यालयातील प्रा. सोमनाथ कोळी यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यामागील उद्देश आणि या स्पर्धेतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्या बद्दल विशेष आभार मानले. या स्पर्धेतील निबंधांचे मूल्यांकन प्रा. अभिजीत सवासे, प्रा. समीर कटेकर आदींनी केले.
प्रा. अभिजीत सवासे यांनी समस्यांनी मूल्यांकन करताना निर्धारित केलेल्या क्रायटेरिया यांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या सहभागाबद्दल विशेष अभिनंदन केले व विजेत्या विद्यार्थ्यांचे ही अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये कुमारी आकांश रमेश पवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक वृषाली नवनाथ वाघमारे आणि तृतीय क्रमांक शिवानी रमेश बागल हिने मिळवल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजच्या वतीने अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सोमनाथ कोळी यांनी केले तर आभार प्रा. राहूल शिंदे यांनी मानले.